Veer Savarkar : बॉडी बिल्डर्सना सावरकरांचा संदेश

त्या काळी सावरकरांना वाटत होते की हिंदू समाजात शारीरिक शक्तीची उणीव आहे. म्हणूनच त्यांनी कविमंडळे, भक्तिमंडळे स्थापन करण्यापेक्षा व्यायाम मंडळे स्थापन व्हावीत असे म्हटले होते.

149

स्त्रिच्या सौंदर्याची व्याख्या बदलली त्याप्रमाणे पुरुषी सौंदर्याची व्याख्या देखील बदलली आहे. आता पैलवान या प्रकाराऐवजी सिक्स पॅक्स असलेल्या बॉडीबिल्डर्सची चलती आहे. हे पिक्स पॅक्स, मसल्स असलेले बॉडीबिल्डर व्यायाम का करतात तर मुलींना आवडतं म्हणून किंवा आपण चांगले दिसतो म्हणून… मात्र आपल्या शारीरिक शक्तीचा उपयोग या लोकांना करुन घेता येत नाही. तसेच राकट शरीर म्हणजेच पुरुषी सौंदर्य असा काही जणांचा समज आहे.

सावरकर याविषयी म्हणतात, “राकटपणा म्हणजेच काही सशक्तपणा नव्हे, शरीराचे गोंडस देखणेपण न गमवताही प्रमाणबद्ध व्यायामाने शरीर सुश्लिष्ट असूनही बलिष्ठ होऊ शकते – जसे कृष्णाचे” सावरकर स्वतः लहानपणापासून व्यायाम करत होते. लहान वयात एक दंडा, दुहेरी दंडा, मलखांब असे ताणते आणि उंची वाढवणारे व्यायाम करायला हवेत असे सावरकरांचे म्हणणे होते. मुलांना बौद्धिक शिक्षणासोबत शारीरिक शिक्षण देणे गरजेचे आहे असे त्यांचे मत होते.

तरुण वयात जोर, बैठका, सूर्यनमस्कार इत्यादी व्यायाम प्रकार सावरकर करत. आता शरीर बळकट झाल्यानंतर केवळ या बलकट शरीराचा दिखावा करण्यातच हयात घालवणारी मंडळी अस्तित्वात आहे. मात्र या शारीरिक शक्तीचा वापर राष्ट्रीय जाणीवेतून करता येईल. व्यायाम संस्थांनी म्हणजेच आजच्या काळात जीमच्या व्यवस्थापकांनी तरुणांना लाठी-काठी, जंबिया यांचा उपयोग करण्याचे प्रशिक्षण दिले पाहिजे.

(हेही वाचा Karnataka : कर्नाटकमध्ये दिसतायेत काँग्रेसच्या घोषणेचे साईडइफेक्ट; मीटर रिडींग करायला आलेल्या वीज विभागाच्या अधिकाऱ्याला चोपले)

त्या काळी सावरकरांना वाटत होते की हिंदू समाजात शारीरिक शक्तीची उणीव आहे. म्हणूनच त्यांनी कविमंडळे, भक्तिमंडळे स्थापन करण्यापेक्षा व्यायाम मंडळे स्थापन व्हावीत असे म्हटले होते. या बॉडीबिल्डर्सनी पुढे जाऊन नेमबाजी प्रशिक्षण अवश्य घ्यावे असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले होते. आता मूळ प्रश्न असा की या शारीरिक शक्तीचे आणि सर्व प्रशिक्षणाचे करायचे तरी काय? केवळ शायनिंग मारण्यात वेळ घालवायचा की राष्ट्रीय जाणीवेतून या प्रशिक्षणाचा उपयोग करुन घ्यायचा?

सावरकर अगदी स्पष्ट शब्दांत सांगतात, “आपल्या स्त्रियांवर, पवित्र स्थानांवर, मंदिरांवर होणारे गुंडांचे हल्ले परतविण्याचे सामार्थ्य तरुणांत उत्पन्न होईल अशा प्रकारचे शिक्षण मुलांमुलींना मिळावे.” याद्वारे सावरकर सर्व बॉडीबिल्डर्सना थेट संदेश देतात की तुमची शारीरिक क्षमता केवळ मुलींना आकर्षित करण्यासाठी, शायनिंग मारण्यासाठी आणि शोभेचा बाहुला बनून मिरवण्यासाठी वाया घालवू नका. तर आपल्या मुलींचे रक्षण करा जेणेकरुन केरला स्टोरीसारखे चित्रपट बनवण्याची वेळ येणार नाही. फडतूस गल्लिछाप मारामार्‍या करण्याऐवजी आपल्या पवित्र व ऐतिहासिक स्थळांचे रक्षण करा. आपली शारीरिक शक्ती हे सज्जनशक्तीचे प्रतीक झाले पाहिजे आणि दुर्जनांना काबुत ठेवण्यासाठी या शक्तीचा वापर केला पाहिजे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.