HSC 2023 Result : आज बारावीचा निकाल; दुपारी २ वाजता ऑनलाईन पाहता येणार

गुणपडताळणीसाठी शुक्रवार 26 मे ते सोमवार 5 जून पर्यंत मुदत देण्यात आली आहे. या काळात विद्यार्थी ऑनलाईन अर्ज दाखल करु शकतात.

219
HSC 2023 Result
HSC 2023 Result : आज बारावीचा निकाल; दुपारी २ वाजता ऑनलाईन पाहता येणार

दहावी बारावीच्या निकालाची (HSC 2023 Result) संपूर्ण राज्याला उत्सुकता लागून राहिलेली असते. घरात बोर्डाचा विद्यार्थी असो वा नसो सगळ्यांचा निकालाकडे डोळा असतो. फेब्रुवारी-मार्चमध्ये राज्यात झालेल्या नानाविध राजकीय-सामाजिक घडामोडींमुळे या वर्षीचा निकाल उशीरा लागणार की काय अशी चिंता सगळ्यांना होती. पण आता ही चिंता कायमची मिटली आहे कारण गुरुवार २५ मे २०२३ रोजी महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल (HSC 2023 Result) जाहीर होणार आहे. दुपारी दोन वाजता निकाल जाहीर होणार आहे.

(हेही वाचा – Helmet : ‘या’ जिल्ह्यात हेल्मेट घातले नाही तर होतो १ हजार रुपये दंड )

इयत्ता बारावीची बोर्डाची (HSC 2023 Result) परीक्षा २१ फेब्रुवारी २०२३ ते २१ मार्च २०२३ दरम्यान झाली. लाखो विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. बारावीचा निकाल ऑनलाईन (HSC 2023 Result) पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी खालील संकेतस्थळांचा वापर करावा.

www.mahresult.nic.in
https://hscresult.mkcl.org/
https://hsc.mahresults.org.in
www.mahresult.nic.in

हेही पहा –
निकालाबाबत आक्षेप असेल तर?

ज्या विद्यार्थ्यांना निकालाबाबत (HSC 2023 Result) आक्षेप असेल अशा विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी, गुणांच्या पडताळणीसाठी अर्ज करावा लागेल. यासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवरुन (http://verification.mh- hsc.ac.in) विद्यार्थ्यांना स्वत: किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फे अर्ज करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी आवश्यक अटी/शर्ती आणि सूचना वेबसाईटवर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणीसाठी शुक्रवार 26 मे ते सोमवार 5 जून पर्यंत मुदत देण्यात आली आहे. या काळात विद्यार्थी ऑनलाईन अर्ज दाखल करु शकतात. शिवाय यासाठी आवश्यक शुल्क ऑनलाईन पद्धतीने (Debit Card/Credit Card/UPI/Net Banking) भरता येईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.