HSC 2023 Result : बारावीचा राज्याचा निकाल 91.25 टक्के; पुन्हा एकदा मुलींनी मारली बाजी

विभागनिहाय निकालाची (HSC 2023 Result) टक्केवारी पाहता कोकण विभाग अव्वल स्थानी असून मुंबईचा निकाल सर्वात कमी लागला आहे.

241
JEE Advanced 2023 : जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पहा निकाल

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च – एप्रिल 2023 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल (HSC 2023 Result) आज म्हणजेच गुरुवार २५ मे रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बोर्डाच्या mahahsscboard.in किंवा maharesult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. मात्र ऑनलाईन निकाल जाहीर होण्यापूर्वी शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, यंदाचा राज्याचा एकूण निकाल 91.25 टक्के इतका लागला आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालातही (HSC 2023 Result) मुलींनी बाजी मारली आहे. यावर्षी 93. 73 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण 89.14 टक्के आहे. म्हणजे परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा पाच टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी बारावीची परीक्षा यंदा 21 फेब्रुवारीपासून सुरू झाली होती. यंदा राज्यभरातून तब्बल १14 लाख 57,293 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षार्थींमध्ये 7 लाख 92,780 विद्यार्थी तर 6 लाख 64,411 विद्यार्थिनी आहेत. 9 विभागीय मंडळांत एकूण 3115 केंद्रांवर परीक्षेसाठी 3 लाख 21,396 कर्मचारी कार्यरत होते. तसेच परीक्षेसाठी 10 मिनिटांचा अतिरिक्त देखील देण्यात आला होता.

(हेही वाचा – BMC : महापालिका शाळांमधील मुलांना यंदा पैशाऐवजी मिळणार दप्तर, डबा आणि खाऊचा डबा)

विभागनिहाय निकालाची (HSC 2023 Result) टक्केवारी पाहता कोकण विभाग अव्वल स्थानी असून मुंबईचा निकाल सर्वात कमी लागला आहे. कोकण विभागाचा निकाल 96.01 टक्के लागला असून मुंबईचा निकाला 88.13 टक्के लागला आहे.

हेही पहा – 

त्याचप्रमाणे पुणे 93.34 टक्के, नागपूर 90.35 टक्के, औरंगाबाद 91.85 टक्के, मुबई 88.13 टक्के, कोल्हापूर 93.28 टक्के, अमरावती 92.75 टक्के, नाशिक 91.66 टक्के, लातूर 90.37 टक्के, तर कोकण 96.01 टक्के असा निकाल लागला आहे.

निकालाबाबत आक्षेप असेल तर?

ज्या विद्यार्थ्यांना निकालाबाबत (HSC 2023 Result) आक्षेप असेल अशा विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी, गुणांच्या पडताळणीसाठी अर्ज करावा लागेल. यासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवरुन (http://verification.mh- hsc.ac.in) विद्यार्थ्यांना स्वत: किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फे अर्ज करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी आवश्यक अटी/शर्ती आणि सूचना वेबसाईटवर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणीसाठी शुक्रवार 26 मे ते सोमवार 5 जून पर्यंत मुदत देण्यात आली आहे. या काळात विद्यार्थी ऑनलाईन अर्ज दाखल करु शकतात. शिवाय यासाठी आवश्यक शुल्क ऑनलाईन पद्धतीने (Debit Card/Credit Card/UPI/Net Banking) भरता येईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.