नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावरून सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षांमध्ये सुरू झालेला वाद आता टोकाला पोहोचला आहे. हा उद्घाटनाचा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. एकूण १९ विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णयाची माहिती संयुक्त निवेदनाद्वारे दिली आहे. याच पार्श्वभूमीवरून बोलत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्षांवर हल्लाबोल केला. तसेच आधीच्या उद्घाटनांचा पाढा वाचत त्यांनी विरोधक खुर्चीचे आणि सत्तेचे सौदागार असल्याची टीका केली.
नक्की फडणवीस काय म्हणाले?
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘हे केवळ संसद भवन नाही, १४० कोटी लोकांच्या आस्थेच मंदिर आहे. त्याच्यावर बहिष्कार घालणं हे लोकशाहीला नाकारण्यासारखं आहे. हे एकीकडे म्हणतात, पंतप्रधानांनी नाही तर राष्ट्रपतींनी उद्घाटन करावं, त्यामुळे मी यांना विचारतो, जेव्हा इंदिरा गांधींनी संसदेच्या एनएक्सचं उद्घाटन केलं, तेव्हा तुम्ही बहिष्कार का नाही घातला? इंदिरा गांधींनी महाराष्ट्राच्या विधानभवनाचं उद्घाटन केलं, तेव्हा ते राज्यपालांच्या हस्ते का करण्यात आलं नाही? राजू गांधींनी संसदेच्या ग्रंथालयाचं उद्घाटन केलं, तेव्हा राष्ट्रपतींची आठवण का आली नाही? एवढंच नाही तर तामिळनाडूमध्ये तिथल्या विधानसभेचे उद्घाटन करताना राज्यपाल नव्हते सोनिया गांधी होत्या किंवा नितीश कुमार यांनी बिहारच्या सेंट्रल हॉलचं उद्घाटन केलं, पण त्यावेळेस का बहिष्कार का घातला नाही? युपीएचं सरकार असताना मणिपूरच्या इम्फालमध्ये मनमोहन सिंग आणि सोनिया गांधींनी तिथल्या विधानभवनाचं उद्घाटन केलं, तेव्हा राज्यपालांच्या हस्ते ते का करण्यात आलं नाही? तरुण गोगोई यांनी २०१४ साली आसामच्या विधानभवनाचं उद्घाटन केलं, त्यावेळेस राज्यपालांना निमंत्रण सुद्धा देण्यात आलं नाही.’
Thread!
The opposition has announced to Boycott the inauguration of the new Parliament building because PM Modi will be inaugurating it.
They are citing that only the President/Governors should inaugurate the Parliament/Assembly buildings.
Here’s a thread highlighting their…
— Sambit Patra (@sambitswaraj) May 24, 2023
‘…तेव्हा सोनिया गांधी कुठल्याही संवैधानिक पदावर नव्हत्या’
पुढे फडणवीस म्हणाले की, ‘२०१४ झारखंडचे हेमंत सोरेन यांनी तिथल्या विधानभवनाचं उद्घाटन केलं, तेव्हा देखील राज्यपालांना निमंत्रित सुद्धा केलं नाही. २०१८मध्ये आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी विधानभवनाचं उद्घाटन केलं, त्यावेळेस राज्यपालांच्या हस्ते का केलं नाही? २०२०मध्ये तर सोनिया गांधींनी छत्तीसगडच्या विधानभवनाचे भूमिपूजन केलं, तेव्हा सोनिया गांधी कुठल्याही संवैधानिक पदावर नव्हत्या, त्या केवळ एक संसद सदस्य होत्या, मग त्यावेळेस या सगळ्या पक्षांनी बहिष्कार का टाकला नाही? ममता बॅनर्जींनी ज्युबली मेमोरियल जी विधानभवनाची इमारत आहे, त्याच उद्घाटन केलं, तेव्हा देखील राज्यपालांना निमंत्रण दिलं नाही.’
‘मोदींजींचा मुकाबला करू शकतं नाही’
‘अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा रिसर्च सेंटरचं उद्घाटन केलं, तेव्हा उपराज्यपालांना निमंत्रण सुद्धा दिलं नाही. तेलंगणाचे मुख्यमंत्र्यांनी विधानभवानाचं उद्घाटन केलं, त्यावेळेस राज्यपालांना निमंत्रण सुद्धा नाही. त्यामुळे अशी अनेक उदाहरणं या ठिकाणी सांगता येतील. ज्यावेळी हे उद्घाटन करतील, त्यावेळी लोकतांत्रिक आणि पंतप्रधान मोदींनी रेकॉर्ड वेळेत नवीन संसद भवन तयार केलं, त्याचं उद्घाटन होत आहे. आता जे संसद भवन आहे, तो कौन्सिल हॉल होता. पहिल्यांदा देशात फूल फ्लेज संसद भवन तयार करण्यात आलं आहे, त्याचं उद्घाटन मोदींजी करतायत तर त्याच्यावर अशाप्रकारे बहिष्कार का? मी स्पष्टपणे सांगू इच्छितो हे सगळे लोकं खुर्ची सौदागर आहेत. हे सत्तेचे सौदागर आहेत. मोदींजींचा मुकाबला करू शकतं नाही, म्हणून सगळे एकत्र आले आहेत. पण माझा यांना सवाल आहे, एवढी उदाहरण मी दिली, त्यावेळेस बहिष्कार का टाकला नाही? याचं पहिलं उत्तर द्या. हे लोकशाही विरोधी लोकं आहेत,’ अशी टीका फडणवीसांनी केली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community