The Kerala Story : ममता बॅनर्जी यांच्या विरोधानंतर पश्चिम बंगालमध्ये ‘द केरळ स्टोरी’ हाऊसफुल्ल

मात्र बंगालमधील बहुतेक थिएटरने द केरळ स्टोरी प्रदर्शित (The Kerala Story) करण्यास नकार दिला असताना, उत्तर 24 परगणा 'बनगाव'मधील सिंगल स्क्रीनने चित्रपट दाखवण्यास सुरुवात केली आहे.

177
The Kerala Story
The Kerala Story : ममता बॅनर्जी यांच्या विरोधानंतर पश्चिम बंगालमध्ये 'द केरळ स्टोरी' हाऊसफुल्ल

हिंदू मुलींना फसवून त्यांच्या मनात हिंदू धर्माबद्दल तिरस्कार निर्माण (The Kerala Story) करणे, विवाहपूर्व त्यांना गरोदर करणे, त्यानंतर त्यांचे मुसलमान धर्मात धर्मांतर करणे, पुढे त्यांना सीरिया येथे नेवून आयसिस सारख्या दहशतवादी संघटनांच्या हवाली करून तिथे त्यांचा वेश्या म्हणून उपयोग करणे अशा वास्तववादी कथेवर आधारित द केरळ स्टोरी (The Kerala Story) या चित्रपटावरून अनेक वाद सुरु आहेत.

(हेही वाचा – The Kerala Story : चित्रपट पाहिल्यावर उच्च शिक्षीत हिंदू तरुणीने १२वी नापास मुसलमान प्रियकराला पाठवले गजाआड)

एकीकडे या चित्रपटाने (The Kerala Story) बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे तर दुसरीकडे ममता बॅनर्जी यांनी काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदीची मागणी केली होती. त्याविरोधात चित्रपट दिग्दर्शक सर्वोच्च न्यायालयात गेले. त्यावेळी न्यायालयाने या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाला कडक शब्दांत सुनावले. देशभर चित्रपट सुरु आहे मग पश्चिम बंगालमध्ये का बंदी?, असा सवाल केला होता. अशातच गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारच्या राज्यात चित्रपटावर बंदी घालण्याच्या आदेशाला स्थगिती दिली.

हेही पहा – 

मात्र बंगालमधील बहुतेक थिएटरने द केरळ स्टोरी प्रदर्शित (The Kerala Story) करण्यास नकार दिला असताना, उत्तर 24 परगणा ‘बनगाव’मधील सिंगल स्क्रीनने चित्रपट दाखवण्यास सुरुवात केली आहे. त्या थिएटरमध्ये जवळपास सगळेच शो हाऊसफुल्ल आहेत आणि त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या विरोधानंतर देखील पश्चिम बंगालमध्ये ‘द केरळ स्टोरी’ हाऊसफुल्ल झाला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.