पावसाळ्याप्रमाणेच उन्हाळाही सुरू झाला की वेगवेगळ्या साथीच्या रोगांची लागण व्हायला सुरुवात होते. त्यांपैकी बरेच रोग हे डास चावल्याने पसरतात. डेंग्यू हा त्यापैकीच एक आहे. डासांमध्ये असलेल्या डेंग्यूच्या वायरसमुळे डेंग्यूच्या तापाची लागण होते. या तापावर वेळीच योग्य उपचार झाले नाहीत तर रोगाची लागण झालेल्या माणसाचा जीवसुद्धा जाऊ शकतो.
इंडियन काऊन्सिलर ऑफ मेडिकल रिसर्चच्या रिपोर्टनुसार जगभरात मोठ्या संख्येने लोक डेंग्यूच्या वायरसमुळे आजारी पडत आहेत आणि त्यापैकी पुष्कळ लोक आजाराची परिस्थिती गंभीर होऊन दगावतात. फक्त भारताचे आकडे पाहिले तर एका वर्षापाठी जवळपास अडीच लाख लोक डेंग्यूमुळे आजारी पडतात. त्यासाठी पुण्यात असलेल्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया नावाच्या औषध निर्मिती कंपनीने डेंग्यूच्या विरुद्ध लढणारी देशातली पहिली वॅक्सिन तयार करायला घेतलीय. एवढेच नव्हे तर ही कंपनी वॅक्सिन तयार होण्याच्या जवळही पोहोचली आहे.
इंडियन काऊन्सिलर ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच lCMR च्या निर्देशानुसार सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि पेनेस्युया बायोटेक या कंपन्यांनी डेंग्यू विरोधात लढणारी लस तयार करण्याच्या थर्ड स्टेपसाठी क्लिनिकल ट्रायलचे आवेदन केले आहे. भारतीय कंपन्यांनी तयार केलेली ही टेट्रावेलेंट डेंग्यू वॅक्सिन कँडीडेटच्या सुरक्षिततेसाठी डेंग्यूविरोधात लढण्यासाठी किती सक्षम आहे ते तपासण्याच्या तिसऱ्या टप्प्यात आहेत. एका वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार यावर्षीच्या बहुतेक ऑगस्ट महिन्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी डेंग्यूची लस उपयोगात आणली जाऊ शकते.
Join Our WhatsApp Community