Smart Phone : स्मार्टफोन वापरताय? मग स्वच्च्छ करण्याची पद्धत देखील जाणून घ्या…

तुम्ही मायक्रोफायबर कपड्याचा वापर केला पाहिजे. यामुळे फोनच्या डिस्प्लेला नुकसान पोहोचणार नाही. उलट तुमचा डिस्ल्पे आधीपेक्षा जास्त छान दिसू लागेल.

149

आपण महागातले स्मार्टफोन विकत घेतो. व्हायरसपासून संरक्षण करण्यासाठी आपण ऍंटि व्हायरस ऍप डाऊनलोड करतो. मात्र मोबाईलची बाह्य काळजी आपल्याकडून घेतली जात नाही. विशेषतः स्क्रीनच्या काळजीकडे आपण सपशेल दुर्लक्ष करतो. फोनची स्क्रीन खूप घाणेरडी होऊन जाते.

कोणत्याही कपड्याने स्क्रीन किंवा बॉडी स्वच्छ करायची नसते. नाहीतर स्क्रीन कायमची खराब होऊ शकते. कोणत्याही घरगुती कपड्याने स्क्रीन स्वच्छ केल्याने समस्या निर्माण होऊ शकते. म्हणूनच तुम्ही मायक्रोफायबर कपड्याचा वापर केला पाहिजे. यामुळे फोनच्या डिस्प्लेला नुकसान पोहोचणार नाही. उलट तुमचा डिस्ल्पे आधीपेक्षा जास्त छान दिसू लागेल.

(हेही वाचा मार्सेलिस येथे उभारण्यात येणाऱ्या वीर सावरकर स्मारकासंदर्भात राहुल नार्वेकरांनी अमित शहांची घेतली भेट)

आता तुम्हाला माहितीच असेल की फोन स्वच्छ करण्यासाठी अनेक क्लीनर बाजारात उपलब्ध असतात. जर तुम्ही चुकून वॉटर बेस्ड क्लीनर वापरलं तर तुमचा महागातला फोन खराब होऊ शकतो. आणि मग तुम्हाला फोन दुरुस्त करायला खूप खर्च पडेल. त्यामुळे आम्ही तुम्हाला एक चांगला उपाय सुचवणार आहोत.

तर मित्रांनो, मायक्रिफायबर क्लोथसह तुम्ही अल्होकोल क्लीनरचा वापर करु शकता. अल्कोहोल क्लीनर हा अत्यंत खात्रीशीर उपाय आहे. यामुळे तुमचा फोन नवा कोरा तर दिसेलच त्याचबरोबर फोनला कोणत्याही प्रकारे हानी पोहोचणार नाही. तर आजपासूनच हे उपाय करा आणि आपला महागातला स्मार्टफोन स्वच्छ आणि सुरक्षित ठेवा.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.