Central Vista : नवीन संसदेच्या उद्घाटनानिमित्त अर्थ मंत्रालयाकडून ७५ रुपयांचं नाणं लॉन्च होणार

नवीन संसद भवनाचे (Central Vista) उद्घाटन २८ मे रोजी होणार आहे. हा सोहळा अधिक संस्मरणीय बनवण्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे.

148
Central Vista : नवीन संसदेच्या उद्घाटनानिमित्त अर्थ मंत्रालयाकडून ७५ रुपयांचं नाणं लॉन्च होणार

संसदेच्या नवीन इमारतीच्या (Central Vista) उद्घाटनाचा वाद थांबता थांबेना. एकूण ४० पक्षांपैकी काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी बहिष्काराची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे, भाजपसह १७ पक्षांनी सरकारचे निमंत्रण स्वीकारले आहे. दरम्यान, राष्ट्रपतींनी नवीन संसद भवनाचे (Central Vista) उद्घाटन करण्याचे निर्देश देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. अशातच संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनानिमित्त अर्थ मंत्रालयाने एक निर्णय घेतला आहे.

(हेही वाचा – Central Vista : राष्ट्रपतींनी संसद भवनाचे उद्घाटन करण्याचे निर्देश देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल)

नवीन संसद भवनाचे (Central Vista) उद्घाटन २८ मे रोजी होणार आहे. हा सोहळा अधिक संस्मरणीय बनवण्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अर्थ मंत्रालयाने गुरुवार २५ मे रोजी नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या स्मरणार्थ ७५ रुपयांचं नाणं (Rs 75 Coin) जारी केलं जाणार असल्याची घोषणा केली.

माहितीनुसार, ७५ रुपयांचे नाणं गोल आकाराचं असेल आणि त्याचा व्यास ४४ मिमी असेल. ७५ रुपयांचं हे नाणं चार धातूंच्या मिश्रणातून बनलेलं असेल, ज्यामध्ये ५० टक्के चांदी, ४० टक्के तांबे, ५ टक्के निकेल आणि ५ टक्के झिंक वापरलं जाणार आहे. या नाण्याचं वजन ३५ ग्रॅम असेल. भारत सरकारच्या कोलकाता टांकसाळीत हे नाणं बनवण्यात आलं आहे. (Central Vista)

हेही पहा – 

नाण्याच्या पुढील बाजूच्या मध्यभागी अशोक स्तंभ आणि सत्यमेव जयतेचा लिहिलेलं असेल. नाण्यावर देवनागरी लिपीत भारत आणि इंग्रजीमध्ये India असं लिहिलेलं असेल. तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला नवीन संसद भवनाचे (Central Vista) चित्र कोरलेलं असेल आणि त्याखाली २०२३ हे वर्ष लिहिलं जाईल. संसद भवनच्या वरच्या बाजूला हिंदीत ‘संसद संकुल’ आणि खालच्या बाजून इंग्रजीमध्ये ‘Parliament Complex’ लिहिलेलं असेल. नाण्याची रचना राज्यघटनेच्या पहिल्या अनुसूचीमध्ये दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार असेल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.