संजय राऊतांवर काढणार चित्रपट; माकडाच्या हातात….; शहाजीबापू पाटलांची घोषणा

130
संजय राऊतांवर काढणार चित्रपट; माकडाच्या हातात....; शहाजीबापू पाटलांची घोषणा
संजय राऊतांवर काढणार चित्रपट; माकडाच्या हातात....; शहाजीबापू पाटलांची घोषणा

‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाच्या धर्तीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी शुक्रवारी, २६ मे रोजी एका चित्रपटाची घोषणा केली. ‘डायरी ऑफ महाराष्ट्र खोका’ असे या चित्रपटाचे नाव असून हा ऐतिहासिक चित्रपट असेल, असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला. त्यानंतर आता शिवसेनेचे (शिंदे गट) नेते शहाजीबापू पाटील यांनी लवकरच राऊतांच्या ‘डायरी ऑफ खोका’या चित्रपटाला टक्कर देणारा चित्रपट काढणार असल्याची घोषणा केली आहे.

शहाजीबापू पाटील कोणता चित्रपट काढणार?

एका खासगी मराठी वृत्तसंस्थेशी बोलत असताना शहाजीबापू पाटील म्हणाले की, ‘खोके, खोके म्हणून संजय राऊत दगड मारीत फिरेल मी अनेकवेळा सांगितले आहे. या माणसाला काविळ झाली आहे. आम्ही पण एक चित्रपट काढण्यासाठी हाती घेतोय. ‘माकडाच्या हातात कोलीत’, असे चित्रपटाचे नाव असेल. उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांसारख्या माकडाच्या हातात कोलीत दिल आहे. महाराष्ट्रात भांडण लावत हिंडायला लागलाय.’

(हेही वाचा – Devednra Fadanvis : संजय राऊत, नाना पटोले बोलघेवडे; देवेंद्र फडणवीस यांनी घेतला समाचार )

संजय राऊत काय म्हणाले होते?

देशात ‘द केरला स्टोरी’ सारखे चित्रपट येत असतील तर आम्ही ‘डायरी ऑफ महाराष्ट्र खोका’ हा चित्रपट काढणार आहे. मी विवेक अग्निहोत्री आणि ‘द केरला स्टोरी’च्या निर्मात्यांना या खोका स्टोरीची कथा देणार आहे. खोका स्टोरी हा मोठा ऐतिहासिक चित्रपट असेल. या चित्रपटामध्ये माणसे कमी आणि खोके जास्त असतील, असे संजय राऊत मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.