Veer Savarkar Jayanti 2023 : मोपला नरसंहार ते केरल स्टोरी आणि पुढे…

सावरकर म्हणतात, धर्म रक्षणासाठी शस्त्र हवं, पण शस्त्रावर अंकुश हवा तो धर्माचा. पण मुसलमानांचा धर्मच 'काफिरांना' मारा असं सांगतो, हिंसेला प्रोत्साहन देतो तर मग त्यांच्यावर अंकुश ठेवणार तरी कोण??

382
  • मंजिरी मराठे

सत्य घटनेवर आधारित ‘केरल स्टोरी’ या चित्रपटामुळे हिंदू मुलींना भुलवून त्यांचं धर्मांतरण करणं, त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करणं, त्यांना दहशतवादी बनवणं या मुस्लिमांच्या कृत्याची आजच्या पिढीला ओळख झाली. खरंतर मुसलमानांनी हिंदूंचं जबरदस्तीनं धर्मांतरण करणं, स्त्रियांना पळवणं, विकणं, त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करणं, बलात्कार करणं हे हिंदूंसाठी काही नवीन नाही. दुर्दैवानं तो हजारो वर्षांचा क्रूर इतिहास आहे. पण जाणूनबुजून इतिहासाची तोडमोड केलेल्या आपल्या देशात खरा इतिहास जनतेसमोर कधी आलाच नाही, स्वार्थासाठी तो समोर येऊ दिला गेला नाही.

छत्रपती संभाजी महाराज, गुरू गोविंदसिंग आणि त्यांची मुलं, बंदा बैरागी आणि त्यांचे शिष्य असे लक्षावधी हिंदू मुसलमानांच्या धर्मवेडाला बळी पडलेच आणि स्त्री तर काय? या अत्याचाऱ्यांसाठीची  एक कायमची, हक्काची, उपभोग्य वस्तूच होती आणि आजही आहे.

सावरकर म्हणतात, धर्म रक्षणासाठी शस्त्र हवं, पण शस्त्रावर अंकुश हवा तो धर्माचा. पण मुसलमानांचा धर्मच ‘काफिरांना’ मारा असं सांगतो, हिंसेला प्रोत्साहन देतो तर मग त्यांच्यावर अंकुश ठेवणार तरी कोण?? केरळमधल्या ज्या घटनेनं आज थोडाफार हिंदू समाज खडबडून जागा होऊ लागला आहे, त्याच केरळच्या मलबार भागात १०२ वर्षांपूर्वी हिंदूंचा नरसंहार झाला होता, जो आज विस्मृतीत गेला आहे.

मलबार – केरळ किनारपट्टीवरील या प्रदेशात व्यापाराच्या निमित्तानं मुसलमान आले. केरळच्या शेवटच्या चेरामन पेरूमल राजानं मुस्लीम धर्म स्वीकारला आणि मग त्यानंच अरबांना मुस्लीम धर्म प्रचारासाठी मलबारला बोलावलं. मुस्लिमांना आयतं रानच मिळालं, दहा मशिदी बांधून त्यांनी धर्मप्रचाराला सुरुवात केली, तिथे वसती केली. त्यावेळेपर्यंत हिंदू ताकदवान होते. पण पुढे अरब व्यापाराला प्रोत्साहन देणाऱ्या कालिकतच्या झामोरीन यानं अरब जहाजांवर काम करण्यासाठी मनुष्यबळ मिळावं यासाठी कोळ्यांच्या घरातील एका तरी पुरुषानं मुस्लीम व्हावं यासाठी धर्मांतरणाला उत्तेजन दिलं. समुद्र ओलांडला तर धर्म भ्रष्ट होईल, आपली हिंदू ही जाती जाईल या खुळचट कल्पनेनं हिंदूंनी धर्मच सोडला.

(हेही वाचा The Kerala Story : ‘मी इतकी कट्टर झाली होती की जर कोणी इस्लाम धर्म स्वीकारला नाही, तर ठार मारले असते; धर्मांतराच्या कचाट्यातून बाहेर पडलेली पीडिता सांगते)

पुढे टिपू सुलतानानं या भागात जबरदस्तीनं धर्मांतरण करण्यास सुरुवात केली. मार्च १७८९मध्ये म्हैसूरच्या फौजांनी दोन हजार नायर कुटुंब असलेल्या कुट्टीपूरमच्या जुन्या किल्ल्याला वेढा घातला. कडथनाथ राजानं किल्ला लढवला पण ताकद संपल्यावर टिपूनं सगळ्यांचं जबरदस्तीनं धर्मांतरण केलं. दुसऱ्याच दिवशी सगळ्या पुरुषांची सुंता करण्यात आली. स्त्री पुरुष सर्वांनाच गोमांस खिलवण्यात आलं. ख्रिश्चन आणि हिंदू स्त्रियांची जबरदस्तीनं मुस्लिमांशी लग्न लावण्यात आली. टिपूच्या सैन्याच्या इतर तुकड्यांसाठी ही घटना आदर्शवत होती. १८ मार्च १७९२ ला टिपूला ब्रिटिशांशी तह करावा लागल्यामुळे संपूर्ण मलबारला मुस्लीम करण्याचं त्याचं स्वप्न भंग पावलं आणि मलबारमध्ये हिंदू थोडातरी शिल्लक उरला. त्यानंतर १९२१ पर्यंत मोपले सातत्यानं हिंदूंवर अत्याचार करत राहिले. १९२१ मध्ये मात्र मोपल्यांनी साऱ्या सीमा ओलांडल्या आणि आपल्या महाभयंकर, अत्यंत घृणास्पद क्रूरतेचं दर्शन घडवलं. खिलाफत चळवळीचा आणि असहकार चळवळीचा तो भीषण परिणाम होता.

मलबारच्या एर्नाड आणि वालुवनादमध्ये खिलाफत राज्याची घोषणा करण्यात आली. अली मन्सूर या खिलाफत नेत्याला राजा घोषित करून खिलाफत ध्वज फडकवण्यात आले.

या साऱ्याचा फटका बसला तो तिथल्या हिंदू जनतेला. ब्रिटिशांनी त्या भागाचा ताबा घेईपर्यंत मोपल्यांनी तिथं अक्षरशः हैदोस घातला. क्रूरतेचा कळस म्हणजे जिवंतपणी हिंदूंची कातडी सोलून काढण्यात आली, मारण्यापूर्वी त्यांनाच त्यांची कबर खोदायला लावण्यात आली. मोपल्यांचे अत्याचार सोसलेल्या मलबारमधील महिलांनी व्हॉईसरॉय लॉर्ड रीडिंग यांच्या पत्नी लेडी रीडिंग यांना आपली दु:खद कहाणी सांगितली.

“…आमच्या पूर्वजांचा धर्म सोडण्यास नकार दिलेल्या आमच्या प्रिय व्यक्तींच्या सडलेल्या प्रेतांनी आणि असंख्य मरणासन्न अवस्थेत फेकलेल्या देहांनी विहिरी आणि तलाव आज भरलेले आहेत; गर्भवती स्त्रियांच्या पोटातून त्यांचे गर्भ बाहेर काढण्यात आले; त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे करून रस्त्यावर, जंगलात फेकण्यात आले; आमच्या मुलाबाळांना आमच्या हातातून खेचून आमच्या डोळ्यांसमोर मारले गेले आणि आमचा पती, पित्याला छळ करून जिवंत जाळले गेले; आमच्या अभागी भगिनींना त्यांच्या आप्तस्वकीयांमधून खेचून काढत त्यांच्यावर त्या नरराक्षसांनी कल्पनाही करता येणार नाही, असे पाशवी अत्याचार केले; विध्वंसाच्या पाशवी आकांक्षेने आमच्या घरादारांची राखरांगोळी केली; आमची मंदिरे अपवित्र करून उद्ध्वस्त केली, मूर्ती फोडण्यात आल्या. विद्रूप केलेल्या देवतांच्या मूर्तीवरील पुष्पहार काढून त्यांच्या गळ्यात गाईंची आतडी घालण्यात आली…आमच्या गावातून आम्हाला नग्नावस्थेत बाहेर काढण्यात आल्यावर आम्ही उपाशीपोटी जंगलात कसे दिवस काढत होतो हे आम्ही विसरू शकत नाही.”

मोपला हत्याकांड ही हिंदूंवरील नृशंस, राक्षसी अत्याचारांची परिसीमा होती. हा दुर्दैवी इतिहास विसरून चालणार नाही. त्याचा तसाच प्रतिशोध घेणं योग्य नाही आणि हिंदूंच्या ते रक्तातही नाही. पण हे परत परत घडू नये यासाठी निद्रिस्त हिंदूंनी जागं होण्याची गरज आहे. या राक्षसी नरसंहारावर सावरकरांनी कादंबरी लिहिली – ‘मोपल्याचे बंड अर्थात मला काय त्याचे’. या पुस्तकातील अत्याचारांची वर्णनं वाचून अंगावर शहारे येतात, ते वाचून मन सुन्न होतं. प्रेतांनी भरलेल्या विहीरी! .. विचारही नकोसा वाटतो. मग ज्यांनी ते प्रत्यक्ष भोगलं, सोसलं, ते घडताना जबरदस्तीनं ज्यांना सारं पहावं लागलं, अर्धमेल्या अवस्थेत ज्यांना प्रेतांनी भरलेल्या विहिरीत फेकण्यात आलं, त्यांची काय अवस्था झाली असेल. हे सारं विसरून जायचं? शेजारचं घरं जळत असताना ‘मला काय त्याचे’ ही वृत्ती ठेवायची. सावरकरांनी हिंदूंच्या याच वृत्तीवर प्रहार केला. आजही आपण झोपलेलेच आहोत त्यामुळे आजूबाजूला काय घडतंय याची जाण आणि भान आपल्याला नाही. भीषण मोपला हत्याकांड घडल्यानंतर ‘शूर मोपला बंधू त्यांच्या धर्मानुसार वागले’ असं म्हणणारा महात्मा जसा तेव्हा होता तसेच ‘केरल स्टोरी’ सारखं कथानक पाहूनही असं काही घडलंच नाही किंवा लव्ह जिहाद असं काही नसतंच असं म्हणणारे, आजचे अनेक महात्मे दुर्दैवानं आपलेच आहेत आणि हीच आपली खरी समस्या आहे. संकट आता प्रत्येकाच्या घराशी येऊन ठेपलं आहे. हिंदुस्थानला दारूल इस्लाम करण्याच्या दृष्टीनं शत्रूची पावलं वेगानं पडू लागली आहेत. त्या मोठ्या षडयंत्राचा ‘केरल स्टोरी’ हा एक भाग आहे हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. जगभर सतत ‘केरल स्टोरी’ घडतच आहेत पण सर्वसाधारण समाजाची प्रतिक्रिया आहे – मला काय त्याचे!

(संदर्भ: सावरकर : विस्मृतीचे पडसाद, लेखक- विक्रम संपत, अनुवाद: रणजित सावरकर, मंजिरी मराठे. २. The Moplah Rebellion, 1921 by C. Gopalan Nair

(लेखिका स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष आहेत.)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.