- संजय दि. मुळ्ये
लक्षावधी हिंदूंना स्फूर्ती देणारे वक्ते, ग्रंथकार, अनेक नाटकांचा विषय होऊ शकणारे नाटककार, महाकाव्याचे नायक होऊ शकणारे महाकवी, हिंदूंचे हृदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी…
मुसलमान गुंडाचे पात्र बदलणार नाही!
‘माझी जन्मठेप’ या आत्मचरित्रात सावरकर जे सांगू शकले नाहीत, ते सर्व त्यांनी ‘काळे पाणी’ या आपल्या कादंबरीमध्ये सांगितले आहे. या कादंबरीवर चित्रपट काढण्याचा विचार चालला होता. या कादंबरीत रफीउद्दीन नावाचा मुसलमान गुंड मालती नावाच्या मुलीवर खूप अत्याचार करतो. या गुंड प्रवृत्तीच्या मुसलमानाचे पात्र बदला, असे चित्रपटाच्या निर्मात्याकडून सावरकरांना सुचवण्यात आले. सावरकरांनी ठामपणे सांगितले की, मी हे पात्र बदलणार नाही. फारतर एखादा मुसलमान चांगला असतो, असे दाखवायचे असेल, तर दुसरे एखादे मुसलमान पात्र त्यात आपण दाखवूया. अर्थातच तो चित्रपट निघू शकला नाही.
आजही चित्रपटातील फाटका मुसलमानसुद्धा दयाळू दाखवला जातो. ख्रिश्चन नर्स परोपकारी दाखवली जाते! मात्र हिंदु बैरागी, लफंगा दाखवला जातो. साहित्यिकांनी आणि पटकथा लेखकांनी सावरकरांचा हा ठामपणा कृतीत आणावा, तसेच मुसलमान समाजाचे चित्रपटांतून आणि साहित्यातून वास्तव चित्रण करावे.
दुसरा प्रश्न होता – आर्थिक प्रश्नावर हिंदु-मुस्लिम ऐक्य होणार नाही का?
सावरकर म्हणाले, ‘‘अवश्य होईल. तसे ते आरोग्यविषयक प्रश्नावरही होईल; पण म्हणून एखाद्या नगरात हिंदु-मुस्लिम ऐक्य साधावे, यासाठी तेथे प्लेगचे जंतू पसरून द्यावेत, असा उपाय तर तुम्ही सुचवणार नाही ना? मर्यादित प्रश्नांवरचे ऐक्य हे मर्यादित स्वरूपाचे एकत्र येणे असते. ते भावनात्मक ऐक्य नव्हे !’ इ.स. ७१२ पासून मुसलमानांच्या अत्याचारांनी हिंदूंना ‘त्राही भगवान्ा’ करून सोडले आहे, तरी ‘देशप्रेमी’ मुसलमानांचे काय करायचे, असा प्रश्न हिंदुत्ववाद्यांना कोंडीत पकडण्यासाठी विचारला जातो. अशा मुसलमानांचे प्रमाण किती असेल, हेही बिभिषणाच्या उदाहरणावरून सावरकरांनी नेमकेपणाने सांगितले आहे.
फाळणीपूर्व दहा वर्षांतील सावरकर विचारांचा प्रसार आवश्यक!
अनेक जण सावरकरांचे विद्यार्थीदशेतील कार्य, लंडनमधील कार्य अन्ा् रत्नागिरीतील समाजसुधारणेचे कार्य यांविषयी भरपूर बोलतात किंवा लेखन करतात. स्वा. सावरकरांचे सर्वच साहित्य अन्ा् कार्य उत्तम आहे, याविषयी शंकाच नाही. तरीही त्यांचे रत्नागिरीत वास्तव्य असेपर्यंतचे कार्य अन्ा् विचार तेवढेच प्रामुख्याने हिंदूंसमोर येतात. काळाला आवश्यक असे मार्गदर्शन सावरकरांनी रत्नागिरीतून बंधनमुक्त झाल्यानंतर अगदी प्रायोपवेशन करेपर्यंत प्रचंड प्रमाणात केले आहे. धर्मांध मुसलमान आणि धर्मांध ख्रिश्चन यांच्या रूपाने काळ ज्या वेगाने हिंदु समाजाचा घास घेण्यासाठी जवळ येत आहे, ते पहाता रत्नागिरीतून मुक्त झाल्यावर ज्या वेगाने सावरकरांनी ‘हिंदुराष्ट्रा’चा पुरस्कार केला, हिंदुमहासभेच्या अध्यक्षपदावरून हिंदूंना मार्गदर्शन केले, जी काही ऐतिहासिक ठरतील अशी फाळणीच्या धोक्याविषयी जागृत करणारी निवेदने प्रसृत केली. प्रामुख्याने ते सर्व समाजासमोर आले पाहिजे. यासाठी सावरकरांचे (शेवटची १५ वर्षे) स्वीय साहाय्यक असलेले आचार्य बाळाराव सावरकर यांनी लिहिलेल्या ‘हिंदुसभा पर्व – भाग १ अणि २’ या चरित्रांतील माहिती, इतिहास अन्ा् मार्गदर्शन यांविषयी सातत्याने जनजागृती केली पाहिजे. सर्वच सावरकरप्रेमींकडून यासंदर्भात जनजागृती होणे अपेक्षित आहे.
सावरकरांना ८३ वर्षांचे आयुष्य लाभले; पण केव्हाही त्यांनी आपल्या राजकीय, सामाजिक आणि व्यक्तिगत जीवनात आपल्या तत्त्वांना हरताळ फासणारे कृत्य केले नाही. व्यासपीठावर एक बोलायचे आणि कृती मात्र वेगळीच करायची, अशा दुटप्पी नेत्यांची त्या वेळीही वानवा नव्हती व आजही नाही. या पार्श्वभूमीवर सावरकरांचे वेगळेपण वरील प्रसंगांतून ठसठशीतपणे लक्षात येते.
देशप्रेमी मुसलमानांचे काय करायचे?
एकदा केसरी सभागृहातील चर्चेत कुणीतरी प्रश्न विचारला, ‘सावरकर, तुम्ही एकूण सर्वच मुसलमानांच्या विरुद्ध बोलता. देशप्रेमी मुसलमान काही प्रमाणात आहेत, हे तुम्ही मानत नाही का ?’ दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर सावरकरांनी प्रतिप्रश्न विचारला, ‘चर्चिलने जेव्हा आठ कोटी जर्मनांविरुद्ध युद्ध घोषित केले, तेव्हा ‘दोन-तीन लक्ष शांतताप्रिय जर्मनांना तरी त्यातून वगळा’, अशी तार तुम्ही पाठवली होती का? युद्धाच्या घाईगर्दीत अशा अपवादात्मक आणि तुरळक लोकांची शीरगणती करायला वेळ नसतो. जे न्यायप्रिय बिभिषण असतात, ते आपणहोऊन तुमच्या बाजूला येतात.’
(लेखक सावरकर साहित्याचे अभ्यासक आहेत.)
Join Our WhatsApp Community