Andheri Sub Way : अंधेरी सब वेच्या ठिकाणी पूरपरिस्थिती रोखण्यासाठी ६.२१ कोटी रुपयांचा खर्च; १४४ दिवसांच्या देखभालीवरच पावणे चार कोटींचा खर्च

मुंबईत दरवर्षी पश्चिम उपनगरातील अंधेरी सब वेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी तुंबण्याचे प्रकार घडत असून हे तुंबले जात असल्याने बऱ्याच वेळा वाहतूक अन्य मार्गाने वळवली जाते. परिणामी या परिसरातील अन्य मार्गावरही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते.

134
प्रातिनिधीक छायाचित्र

अंधेरीतील गोपाळ कृष्ण गोखले उड्डाणपूल बंद असल्याने तसेच मोगरा नाल्यावरील पंपिंग स्टेशनचे काम रखडल्याने अंधेरी सब वेमध्ये पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाणी समस्येवर तात्पुरता उपाय म्हणून मोगरा नाल्यात दोन ठिकाणी फ्लड गेट बसवून त्याठिकाणी ३००० घन मीटर प्रतितास क्षमतेचे सहा पंप बसवले जाणार आहेत. या पंपामुळे अंधेरी सब वेच्या ठिकाणी जमा होणाऱ्या पाण्याचा वेगाने निचरा होऊन एकप्रकारे पावसातही या मार्गावरील वाहतूक सुरळीत राहिल असा विश्वास महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वाटत आहे. मात्र, यासाठी सुमारे ६.२१ कोटी रुपये खर्च होणार असून त्यापैकी १४४  दिवसांच्या देखभालीसाठी केवळ ३.७३ कोटी रुपयांचा खर्च होणार असल्याने पंपांच्या नावाखाली पैसाही पाण्यासारखा वाहिला जात असल्याचे बोलले जात आहे

मुंबईत दरवर्षी पश्चिम उपनगरातील अंधेरी सब वेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी तुंबण्याचे प्रकार घडत असून हे तुंबले जात असल्याने बऱ्याच वेळा वाहतूक अन्य मार्गाने वळवली जाते. परिणामी या परिसरातील अन्य मार्गावरही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते. अंधेरी सब वेमधील पाणी मोगरा नाल्यातून वाहून जाते. परंतु अंधेरी सब वेच्या ठिकाणी पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी आहे, तसेच बशी सारखा आकार असल्यामुळे पाण्याचा निचरा जलदगतीने होत नाही. त्यामुळे या भागात पूरपरिस्थिती निर्माण होते. सध्या तांत्रिक कारणामुळे या नाल्याचे रुंदीकरण होऊ शकलेले नसून अंधेरी सब वेच्या ठिकाणी निर्माण होणारी पूरपरिस्थिती टाळण्यासाठी आयआयटी मुंबईने विविध पर्याय सुचवले आहे. परंतु हे पर्याय खर्चिक तसेच तांत्रिकदृष्ट्या अडचणीचे असल्याने अंमलात आणणे शक्य नाही. तसेच या अंधेरी सब वेच्या ठिकाणी १००० घन मीटर प्रति तास क्षमतेचे दोन पंप बसवूनही ते अपुरे पडत आहे.

(हेही वाचा Samruddhi Highway : समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण करणार – मुख्यमंत्री शिंदे)

त्यातच गोपाळ कृष्ण गोखले पूल बंद असून यापैकी दोन मार्गिक ३१ मे रोजी सुरु होण्याची शक्यता आहे. परंतु भविष्यात काही अनपेक्षित अडचणी निर्माण झाल्यास या पुलावरील वाहतूक ठप्प होण्याची शक्यता असल्याने महापा अंधेरी सब वेच्या ठिकाणी पूरपरिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोगरा नाल्यात फ्लडगेट बसवून प्रत्येकी तीन ३ हजार घन मीटर प्रती तास क्षमततेचे पंप भाडेतत्वावर घेऊन बसवण्याचा निर्णय घेतला आहे. मोगरा नाल्यात मिलेनियम इमारतीजवळ दोन ठिकाणी तर वीरा देसाई रोड येथील श्रीकृष्ण मंदिराजवळ पावसाळ्याच्या कालावधीत हे फ्लडगेट बसवले जाणार आहेत. हे भाडेतत्वावरील पंप पुरवून त्यांची पुढील देखभाल करण्यासाठी साज एंटरप्रायझेस या कंपनीची निवड करण्यात आली असून यासाठी  ६ कोटी २१ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. विशेष म्हणजे पंप बसण्यासाठी सुमारे २.४४ कोटी रुपयांचा खर्च असून देखभालीसाठी ३.७६ कोटी रुपये अशाप्रकारे एकूण ६.२१ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. सुमारे १४४ दिवसांच्या या पंपाच्या देखभाल व दुरुस्तीसाठी पंप बसवण्याच्या खर्चाच्या तुलने दीड पटीने खर्च केला जात असल्याने तुंबणाऱ्या पाण्याची भीती दाखवून एकप्रकारे पंपाच्या खर्चावर पाण्यासारखा पैसा वाहिला जात असल्याचे दिसून येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.