प्राची जांभेकर पुन्हा मुंबई महापालिकेत; संचालक (नियोजन) पदी नियुक्ती

विशेष म्हणजे नियोजन विभागाला सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी वलय निर्माण करून या खात्याचे महत्व वाढवत जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून विविध योजनांसह विविध विकास प्रकल्प राबवले होते.

1471
प्राची जांभेकर पुन्हा मुंबई महापालिकेत; संचालक (नियोजन) पदी नियुक्ती

मुंबई महापालिकेच्या नियोजन विभागाच्या कामात सुसूत्रता आणून या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या मोहिमांना गती देण्यासाठी या विभागासाठी नव्याने संचालक पद निर्माण करण्यात आले आहे. या संचालक पदी राज्य शासनातील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्राची जांभेकर (Prachi Jambhekar) यांची वर्णी लावण्यात आली आहे. जांभेकर यांनी यापूर्वी महापालिका नियोजन विभागाचा कार्यभार सांभाळला होता. परंतु शासनातील त्यांचे पद हे सहायक आयुक्तांच्या पदाच्या वर असल्याने त्यासाठी नियोजन विभागासाठी संचालक हे पद नव्याने निर्माण करुन या पदावर त्यांची वर्णी लावण्यात आली आहे.

राज्य शासनातील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्राची जांभेकर (Prachi Jambhekar) यांना प्रतिनियुक्तीवर मुंबई महापालिकेत पाठवण्यात आले असून त्यांची नियुक्ती महापालिका आयुक्तांनी संचालक (नियोजन) या पदी केली आहे. या पदाचा अतिरिक्त भार सध्या सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांच्याकडे होता. त्यामुळे सपकाळे यांच्याकडील नियोजन विभागाच्या अतिरिक्त कार्यभाग काढून घेत प्राची जांभेकर यांच्याकडे देण्यात आला आहे.

(हेही वाचा – प्रकल्प बाधितांना आता घराऐवजी मिळणार किमान २५ लाख रुपये; महापालिकेच्या जुन्या धोरणात केला बदल)

जांभेकर (Prachi Jambhekar) यांनी ऑक्टोबर २०१२ – २०१५ च्या कालावधीत सहायक आयुक्त (नियोजन) विभागाचा कार्यभार सांभाळला होता. या कालावधीत त्यांनी मालाड पूर्व येथे वृध्दाश्रम तथा त्यांच्याकरता डे केअर सेंटरसह पाळणाघर बांधण्यासाठी प्रथम प्रयत्न केले होते. तसेच ज्येष्ठ नागरिक धोरण बनवले होते. तसेच शहरातील व उपनगरातील विविध उद्यानांमध्ये विरंगुळा केंद्रे ज्येष्ठांकरीता तयार करण्यात आलेली आहेत.

हेही पहा – 

विशेष म्हणजे नियोजन विभागाला सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी वलय निर्माण करून या खात्याचे महत्व वाढवत जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून विविध योजनांसह विविध विकास प्रकल्प राबवले होते. त्यांच्यानंतर सहायक आयुक्त ( नियोजन) विभागाचा अतिरिक्त कार्यभार संभाळताना सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी या विभागाच्या माध्यमातून महिला तसेच अंध व अपंग व्यक्तींना आर्थिक सक्षम करणयासाठी विविध योजना राबवून त्यांना याचा लाभ देण्यासाठी भरीव तरतूद चालू आर्थिक वर्षात करून घेतली. त्यामुळे प्रथमच या खात्याला २०० हुन अधिक कोटींची तरतूद होऊ शकली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.