मध्य रेल्वे, (Mega Block) मुंबई विभाग रविवार, २८ मे २०२३ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक परीचालीत करणार आहे.
उपनगरीय रेल्वेच्या देखभाल-दुरुस्तीकरिता मध्य रेल्वेकडून मुख्य मार्गावर आणि हार्बर मार्गावर नियमिपणे घेण्यात येणार मेगाब्लॉक (Mega Block) रविवारी नसणार आहे. तर ट्रान्स हार्बर मार्गावर ,रविवार २८ मे रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
(हेही वाचा – western railway windmill : रेल्वे रुळांवर उभारल्या पवनचक्क्या; पश्चिम रेल्वेचा अनोखा उपक्रम)
रविवारी ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी-नेरुळ दरम्यान अप आणि डाउन मार्गावर सकाळी ११ .१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यत दुरुस्ती करण्यात येणार आहे. या दरम्यान ठाणे ते वाशी-नेरुळ-पनवेल दरम्यानची लोकल सेवा बंद (Mega Block) राहणार आहे. ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवासी मुख्य आणि हार्बर मार्गाने प्रवास करू शकणार आहे.
हेही पहा –
– ठाणे येथून सकाळी १०.३५ ते सायंकाळी ०४.०७ वाजेपर्यंत वाशी/नेरुळ/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाउन मार्गावरील सेवा आणि
– वाशी/नेरूळ/पनवेल येथून सकाळी १०.२५ ते सायंकाळी ०४.०९ वाजेपर्यंत ठाणे करीता सुटणाऱ्या अप मार्गावरील सेवा बंद राहतील.
त्यामुळे नागरिकांनी रविवारी बाहेर पडतांना योग्य नियोजन करून बाहेर पडावे.
Join Our WhatsApp Community