महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण (HSC Result) मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेली उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी (HSC Result) लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च 2023 या कालावधीत लातूर, औरंगाबाद, अमरावती, पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत आयोजित करण्यात आली होती.
(हेही वाचा – मुंबईतील २२६ इमारती अतिधोकादायक)
या परीक्षेचा निकाल (HSC Result) 25 मे 2023 रोजी दुपारी 2 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला. निकालानंतर काही विद्यार्थी नकारात्मक विचाराने मानसिक दडपणाखाली येण्याची शक्यता असते.
हेही पहा –
अशा विद्यार्थ्यांना (HSC Result) राज्यमंडळ स्तरावरुन नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन सेवा सुरु ठेवण्यात येत आहे. त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक पुढील प्रमाणे आहेत. 7387400970, 8308755241, 9834951752, 8421150528, 9404682716, 9373546299, 8999923229, 9321315928, 7387647102, 8767753069 हे भ्रमणध्वनी क्रमांक दिलेले समुपदेशक परीक्षेच्या निकालाच्या (HSC Result) दिवसापासून 8 दिवस सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनीद्वारे निशुल्क आवश्यक ते समुपदेशन करतील. विद्यार्थी, पालक यांनी यांची नोंद घ्यावी, असे आवाहन राज्यमंडळाचे सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे.
Join Our WhatsApp Community