ट्रेनमधून एका महिलेचा २ लाख १० हजार रुपये किंमतीचा मोबाईल फोन चोरी (Mobile thief) करून हा महागडा फोन चोरट्याने केवळ ३ हजार रुपयात एकाला विकल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला आहे. सीएसएमटी रेल्वे पोलिसांनी २४ तासांत या चोरट्याचा शोध घेऊन महागडा फोन हस्तगत केला आहे.
छत्रपती शिवाजी टर्मिनस कडे येणाऱ्या उपनगरीय लोकल ट्रेनच्या महिला फर्स्ट क्लास च्या डब्यातून प्रवास करणाऱ्या एका महिलेचा २ लाख १० हजार रुपये किंमतीचा ‘सॅमसंग गॅलेक्सि झेड फोल्ड ५जी’ हा महागडा फोन चोरीला (Mobile thief) गेला होता. गुरुवारी (२५ मे) याप्रकरणी सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. सीएसएमटी रेल्वे पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून घेत मोबाईल चोराच्या शोधासाठी सीएसएमटी रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही तपासण्यात आले असता एक संशयित इसम सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आला. या संशयिताची माहिती काढण्यात आली असता सदर संशयित हा कुर्ला पूर्व ठक्करबाप्पा वसाहत येथे वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
(हेही वाचा – Crime : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शाखाप्रमुखाची हत्या)
हेमराज भवनलाल बन्सीवाल (३०) असे या आरोपीचे (Mobile thief) नाव असून त्याला ठक्करबाप्पा वसाहत येथून शुक्रवारी (२६ मे ) ताब्यात घेतले. त्यांनतर चौकशीदरम्यान त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. तसेच चोरलेला महागडा मोबाईल त्याने त्याच परिसरात राहणाऱ्या देवीलाल चौहान याला केवळ ३ हजार रुपयात विकल्याची माहिती दिली.
हेही पहा –
सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय तायडे, पोलीस निरीक्षक सचिन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सतीश शिरसाठ आणि पथकाने देवीलाल चौहान याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळून २ लाख १० हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन (Mobile thief) देखील हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी मोबाईल चोरी करणारा आरोपी हेमराज बन्सीवाल आणि चोरीचा मोबाईल विकत घेणारा देविदास चौहान या दोघांना चोरीच्या गुन्हयात अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देविदास या मोबाईलसाठी दुसरे ग्राहक बघत होता, मात्र वेळीच पोलिसांनी अटक केल्यामुळे महागडा मोबाईल (Mobile thief) फोन तिसऱ्याच्या हाती लागण्यापूर्वी मिळून आला.
Join Our WhatsApp Community