विधानसभेच्या १५ जागा तर लोकसभेची एक जागा लढवणार – बच्चू कडू

168
विधानसभेच्या १५ जागा तर लोकसभेची एक जागा लढवणार - बच्चू कडू
विधानसभेच्या १५ जागा तर लोकसभेची एक जागा लढवणार - बच्चू कडू

सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते उमेदवारी आणि जागांवर दावा करताना दिसत आहे. अमरावती लोकसभा जागेवर प्रहारचे संघटनेचे नेते व आमदार बच्चू कडू आणि खासदार नवनीत राणा यांच्याकडून दावा करण्यात आला आहे. विधानसभेसाठी १५ जागा तर लोकसभेची एक जागा लढवणार असल्याचे बच्चू कडू यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

बच्चू कडू काय म्हणाले?

प्रसार माध्यमांसोबत बोलताना बच्चू कडू म्हणाले की, ‘अमरावती लोकसभेवरती आमचा दावा आहे. या जागेसाठी आम्ही आग्रही आहोत. यापूर्वी मी इथे निवडणूक लढवली आहे. अपक्ष लढवून पाच हजार मते मिळवली होती. ही जागा आरक्षित आहे. आणि आमच्याकडेही ताकदीचा उमेदवार आहे. कुणाशीही लढत झाली तरी आमचा उमेदवार ताकदीचा आहे. युतीमध्ये ही जागा आम्हाला मिळावी, अशी आमची आग्रही मागणी आहे.’

(हेही वाचा – राहुल नार्वेकरांची निवडणूक आयोगाकडे धाव; सत्तासंघर्षाच्या कारवाईला वेग)

‘आम्ही निवडणुकींच्या तयारीत आहोत. आमची याबाबत एक बैठक झाली. १५ जागा विधानसभेच्या आणि एक जागा लोकसभेची लढवणार आहोत. युतीमध्ये घटक पक्ष म्हणून कसे पुढे जाता येईल, याची चाचपणी करतो आहोत. पण युतीत ताळमेळ नाही जमल्यास आम्ही निवडणुकींना वेगळे सामोरे जावू,’ असा इशारा बच्चू कडूंनी दिला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.