राज्यात यंदा अवकाळी पाऊस (Monsoon) आणि वाढत्या तापमानामुळे मोठं नुकसान झालं आहे. अशातच आता येणार मान्सून (Monsoon) नेमका कसा असेल याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. मात्र यंदा सरासरीपेक्षा जून महिन्यात कमी पाऊस पडणार आहे. यंदा मान्सून ४ जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होऊ शकतो. मात्र, यंदा जूनमध्ये (Monsoon) सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर हंगामात सरासरीच्या ९६ टक्के पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.
(हेही वाचा – Online Admission : मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणीचे वेळापत्रक जाहीर; ‘या’ तारखेपासून भरता येणार अर्ज)
भारतीय हवामानशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. डी. शिवानंद पै यांनी जूनचा पावसाचा (Monsoon) अंदाज आणि मोसमी हंगामाच्या दीर्घकालीन सुधारित अंदाजाची माहिती दिली. सध्या र्नैऋत्य मोसमी वारे अंदमान-निकोबारजवळ आहेत. आता त्यांच्या पुढील प्रवासासाठी अनुकूल स्थिती असल्याने मोसमी पाऊस ४ जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता असल्याचे डॉ. पै यांनी सांगितले.
हेही पहा –
देशभरात पूर्वमोसमी पाऊस चांगला झाला. एकंदर सरासरीपेक्षा १२ टक्के अधिक, तर मेमध्ये सरासरीपेक्षा ८ टक्के अधिक पाऊस पडला.
Join Our WhatsApp Community