Temple Dress Code : सुप्रसिद्ध सप्तशृंगी मंदिरात वस्त्रसंहिता लागू

देवीच्या गाभाऱ्यात दर्शनाला जाताना स्त्री-पुरुषांना विशिष्ट पेहराव करणे बंधनकारक आहे. सरसकट गाभाऱ्यात प्रवेश मिळणार नाही.

207

नाशिकजवळ सुप्रसिद्ध सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला जाणार असाल, तर आता नवीन नियम असणार आहे. सप्तशृंगी मंदिरातही आता ड्रेसकोड लागू होणार आहे. पूर्ण पेहरावात आल्यावरच सप्तशृंगी देवीचं दर्शन घेता येणार आहे. मंदिर व्यवस्थापन, विश्वस्त मंडळ आणि ग्रामस्थांनी मिळून हा निर्णय घेतला आहे.

तेव्हा गडावर येणाऱ्या भाविकांना आता पूर्ण पेहरावाची सक्ती केली जाणार आहे. नाशिकमध्येच वाईन पर्यटनही होते. तेव्हा तिथले पर्यटक तोकड्या कपड्यांमध्येच देवीच्या दर्शनालाही येतात. त्यांना आवर घालण्यासाठी ड्रेसकोडची सक्ती केली जाणार आहे. नाशिकजवळ वणीला येथील डोंगरावर असलेले हे देवीचे स्थान राज्यातील साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धं पीठ मानले जाते. या देवीच्या दर्शनाला राज्यभरातूनच नाही तर देशभरातून भक्त येत असतात. देवस्थान ट्रस्टने देवीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी याआधी काही नियम घातले आहेत. त्यानुसार देवीच्या गाभाऱ्यात दर्शनाला जाताना स्त्री-पुरुषांना विशिष्ट पेहराव करणे बंधनकारक आहे. सरसकट गाभाऱ्यात प्रवेश मिळणार नाही.

(हेही वाचा New Parliament building : नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावर शरद पवारांची टीका; म्हणाले…)

पुरुषांना सोवळे आणि महिलांना साडी नेसून आरतीनंतर दर्शन घेता येणार आहे. तसेच दक्षिणेकडच्या देवस्थानांमध्ये स्त्री-पुरुषांनी कोणता पेहराव करून मंदिरात दर्शनाला जायचं याचे काही कडक नियम आहेत. त्याप्रमाणे आता सप्तशृंगी मंदिरातही आता ड्रेसकोड लागू होणार आहे. पूर्ण पेहरावात आल्यावरच सप्तशृंगी देवीचं दर्शन घेता येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.