रविवार, २८ मे २०२३ रोजी हिंदू संघटक स्वातंत्र्यवीर सावरकर यांची १४०वी जयंती उत्सव महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी उत्साहात साजरी केली गेली. मुंबईतील ज्ञानदा प्रबोधन संस्था आणि मॅनेजमेंट गुरु अशी ओळख असणारे व जागतिक स्तरावर स्वतःच्या नावाचा ठसा उमटवणाऱ्या मुंबई डब्बेवाला संघटनेने संयुक्तरित्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात सकाळी सावरकरांच्या पुतळ्याला डब्बेवाला संघटनेचे अध्यक्ष उल्हास मुके व रामदास करवंदे तसेच राष्ट्र सेविका समितीच्या प्रचारिका कुंदाताई फाटक व अध्यक्ष प्रशांत पळ यांच्या हस्ते पुष्पार्पण करून मानवंदना देण्यात आली.
त्यावेळी डब्बेवाला संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच ज्ञानदा प्रबोधनाचे पदाधिकारी नितीन येंडे, संतोष नारायणे, ऍड. भक्ती जोगल, विजयानंद कामत उपस्थित होते. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील वीर सावारकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पार्पण केल्यानंतर ज्या पवित्र वास्तूत सावरकर वास्तव्यास होते त्या वास्तूमधील ज्या खोलीत त्यांनी आत्मार्पण केले, त्या खोलीत सर्वांनी सावरकरांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आभिवादन केले. त्यावेळी सर्वांनी सावरकरांच्या स्नुषा सुंदर विश्वासराव सावरकर यांचे आशीर्वाद घेतले. गेल्या अनेक वर्षांपासून केंद्र व राज्य सरकारकडे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सन्मानार्थ काही महत्वाच्या मागण्या करत असलेल्या ज्ञानदा प्रबोधनासोबत आता मुंबई डब्बेवाला संघटना केंद्र व राज्य सरकारला विनंती पत्र देणार आहेत.
Join Our WhatsApp Community