“झाडे आहेत, तर जीवन आहे” अशा आशयाच्या घोषणा देताना आपण थकत नाही. पण वैयक्तिक पातळीवर आपण खरंच झाडे लावतो का? या धकाधकीच्या जीवनात इच्छा असूनही झाडे लावायला वेळ मिळेलच असे नाही. पण इच्छा असल्यावर मार्ग सापडतोच. जर झाडे लावण्यासाठी बाहेर जाणे तुम्हाला शक्य नसेल तर घरबसल्या प्रश्न विचारून झाडे लावा. कशी वाटते कल्पना? ही आता कल्पना राहिलेली नाही तर हा वास्तवतेचा विषय बनला आहे. एक अनोखे सर्च इंजिन अशा प्रकारे काम करते.
प्रश्न विचारा झाडे लावा
गुगल प्रमाणे काम करणारे एक विश्वसनीय सर्च इंजिन म्हणजे इकोसिया. इकोसिया ही एक जर्मन कंपनी आहे. या कंपनीने जवळपास दशकभराच्या कालावधीत १७४ दशलक्षाहून अधिक झाडे लावली आहेत. कंपनी दावा करते की, एकूण उत्पन्नाच्या ८० टक्के नफा हा झाडे लावण्यासाठी खर्च केला जातो. याबद्दल वापरकर्त्यांना अधिक स्पष्टता देण्यासाठी कंपनी प्रत्येक महिन्याचे आर्थिक उत्पन्न सार्वजनिकरित्या जाहिर करते.
(हेही वाचा – Photographer : लाखो रुपयांची नोकरी सोडून फोटोग्राफी करणार्या अवलियला भेटा)
मी दाता बनणार
वाढत्या प्रदूषणाने पृथ्वीचे अपरिमित नुकसान होते आहे. यावर सहज सोपा उपाय म्हणजे इकोसियाचा वापर करणे. इकोसियाच्या मदतीने प्रत्येक दिवशी पृथ्वीवर एक झाड लावणे प्रत्येकाला शक्य आहे. कंपनीने दावा केला आहे की, ४५ सर्चचा परिणाम म्हणजे एका वृक्षाचे रोपण. साधारणपणे सामान्य युजर प्रतिदिन ४-५ गोष्टींची माहिती सर्च इंजिनला विचारतो. याचा अर्थ अवघ्या नऊ दिवसांच्या कालावधीत तुम्ही घरबसल्या झाड लावू शकता. गुगल प्ले स्टोअरवर इकोसियाचे मोबाईल अॅप उपलब्ध आहे. कॉम्प्युटरवर इकोसिया वापरण्यासाठी क्रोम एक्सटेंशन डाऊनलोड करावे.
विश्वची माझे घर
इकोसियाने गेल्या काही काळात जगातील ३५ राष्ट्रांमध्ये यशस्वी वृक्षरोपण केले आहे. यात पुढील राष्ट्रांचा समावेश होतो.
- भारत
- फ्रान्स
- युनायटेड किंगडम
- ब्राझील
- इंडोनेशिया
- थायलंड
- नायजेरीया
- सुदान
- मेक्सिको
हेही पहा –
Join Our WhatsApp Community