Water Pipe Line : कुर्ला खैरानी रस्त्यावरील जलवाहिनी दुरुस्तीचे काम अखेर पुर्ण; ‘या’ भागातील लोकांची पाणी समस्या कायमची मिटली

ज्या भागातील जलवाह‍िनी (Water Pipe Line) भौगोल‍िक आण‍ि वाहतुकीच्या कारणास्तव बदलणे शक्य नसते, अशा ठ‍िकाणी सीआयपीपी तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.

158
Water Pipe Line : कुर्ला खैरानी रस्त्यावरील जलवाहिनी दुरुस्तीचे काम अखेर पुर्ण; 'या' भागातील लोकांची पाणी समस्या कायमची मिटली

मुंबईतील पूर्व उपनगरात एल विभाग हद्दीत, खैरानी रस्ता येथे असलेली सुमारे ८०० मीटर लांब जलवाहिनी (Water Pipe Line) ही अत्याधुन‍िक ‘सीआयपीपी’ तंत्रज्ञानाचा वापर करून दुरुस्त करण्याचे आव्हानात्मक काम महानगरपालिकेने अखेर पूर्ण केले. अरुंद जागेत असलेली ही जलवाहिनी टप्प्याटप्याने दुरुस्त केल्याने परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवता आला, सोबतच मजबुतीकरण झाल्याने आता या जलवाहिनीची क्षमता आणि आयुर्मानही वाढले आहे. त्यामुळे संघर्ष नगर, लॉयलका कंपाऊंड, सुभाष नगर, भानुशालीवाडी, यादव नगर, दुर्गामाता मंदीर, कुलकर्णीवाडी, डिसुजा कंपाऊंड, लक्ष्मी नारायण रस्ता, जोश नगर, आजाद मार्केट यासह अनेक पर‍िसरातील पाणी समस्या कायमची दूर झाली आहे.

(हेही वाचा – BMC : वांद्रे पूर्व ते वाकोलादरम्यान यंदाही तुंबणार नाही पाणी; महापालिका प्रशासनाने केली ही उपाययोजना)

खैरानी रस्ता येथे सुमारे ३० वर्षांपासून असलेल्या भूमिगत १,२०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीला (Water Pipe Line) (असल्फा आऊटलेट) मागील काही द‍िवसांपासून गळती सुरू असल्याचे लक्षात आले होते. खैरानी रस्ता पर‍िसर अत‍िशय अरुंद आण‍ि वाहतुकीची वर्दळ असलेला आहे. एवढेच नव्हे तर, एल विभागात संघर्ष नगर, लॉयलका कंपाऊंड, सुभाष नगर, भानुशालीवाडी, यादव नगर, दुर्गामाता मंदीर, कुलकर्णीवाडी, डिसुजा कंपाऊंड, लक्ष्मी नारायण रस्ता, जोश नगर, आजाद मार्केट यासह अनेक पर‍िसराला या जलवाह‍िनीने पाणीपुरवठा केला जातो. अशा स्थितीत, या जलवाहिनीचे दुरुस्तीचे काम सलग हाती घेणे देखील शक्य नव्हते. कारण त्यातून परिसरातील रहिवाशांची प्रचंड गैरसाय झाली असती.

या अडचणी असल्या तरी, जलवाहिनीचे (Water Pipe Line) पुनर्वसन करण्याशिवाय समोर पर्याय नव्हता. या अनुषंगाने झालेल्या बैठकीत चर्चा केल्यानंतर, जल अभियंता विभागाने योग्य त्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा शोध घेऊन त्याचा उपयोग करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिले होते. त्यानुसार उपआयुक्त (विशेष अभियांत्रिकी) चक्रधर कांडलकर, प्रभारी जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी चाचपणी केली. अखेर, सीआयपीपी (Cure in placed pipe) या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचे निश्चित करण्यात आले.

हेही पहा – 

जल अभियंता खाते अंतर्गत, उप जल अभियंता (परिरक्षण) उपव‍िभागाने खैरानी रस्ता जलवाहिनीवरून (Water Pipe Line) दर शनिवारी याप्रमाणे दहा आठवडे शनिवारी पाणीपुरवठा बंद ठेवून टप्प्याटप्प्याने जलवाहिनी दुरुस्ती काम हाती घेतले. अखेर काल (शनिवार, दिनांक २७ मे २०२३) हे काम पूर्ण झाले.

उप जल अभियंता (परिरक्षण) व‍िभागातील कुशल अभ‍ियंता आण‍ि कामगारांनी प्रत्येक शनिवारी सुमारे ८० मीटर लांब जलवाहिनीचे पुनर्वसन, मजबुतीकरण काम केले. अशाप्रकारे सलग दहा शन‍िवारी काम करून संपूर्ण ८०० मीटर मजबुतीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. आता या भागातील पाणीपुरवठा सुरळीत असून, नागरिकांची कोणतीही गैरसोय न करता ही मोहीम पूर्ण करण्यात आली.

या तंत्रज्ञानाचा केला वापर !

ज्या भागातील जलवाह‍िनी (Water Pipe Line) भौगोल‍िक आण‍ि वाहतुकीच्या कारणास्तव बदलणे शक्य नसते, अशा ठ‍िकाणी सीआयपीपी तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. अनेक वर्ष सततच्या वापरामुळे जलवाह‍िन्यांना गंज चढतो. त्यामुळे पाणी वाहून नेण्यात अडथळा न‍िर्माण होतो आण‍ि जलवाह‍िनीला गळली लागते. असल्फा आउटलेटमध्येही हीच समस्या होती. त्यामुळे सुरुवातीला या जलवाह‍िनीतील गंज पूर्णपणे काढून नंतर त्यावर रासायन‍िक पदार्थांचा मुलामा देण्यात आला. नंतर जलवाह‍िनीतून रबरी आवरण सोडून त्यात हवा भरण्यात आली. हवा भरल्यानंतर हे रबरी आवरण जलवाह‍िनीला च‍िकटले. हे आवरण च‍िकटल्यानंतर हवा काढण्यात आली. अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने सीआयपीपी तंत्रज्ञानाच्या आधारे हे काम पूर्ण करण्यात आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.