विनायक दामोदर सावरकर यांची 140 वी जयंती (Veer Savarkar Jayanti 2023) भगूर येथील त्यांच्या जन्मस्थळी ब्राह्मण महासंघातर्फे साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी श्री महंत सुधीरदासजी महाराज काळाराम मंदिर नासिक तसेच श्री महंत स्वामी अनिकेत शास्त्री देशपांडे महाराज, श्री मंडलाचार्य पिठाधीश्वर नासिक हे होते. तर, प्रमुख पाहुणे ब्राह्मण महासंघ संस्थापक अध्यक्ष आनंद दवे, विश्वस्त मनोज तारे, विश्वस्त स्मिता कुलकर्णी, नाशिक जिल्हाध्यक्ष डॉ दिलीप जोशी, शहराध्यक्ष भगवंत बाळासाहेब पाठक, प्रदेश कार्याध्यक्ष प्रवीण शिरशीकर, बार्शी, शुक्ल देशपांडे उपस्थित होते.
यावेळी वीर सावरकरांच्या (Veer Savarkar Jayanti 2023) प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. सुधीर दास महंत यांनी सावरकर यांचे कार्य तसेच समाज प्रबोधन वर भाष्य केले तर अनिकेत शास्त्री यांनी वीर सावरकरांच्या आठवणी इतिहास व भविष्यातील कार्यकल्पकतेवर विचार मांडले. आनंद दवे यांनी अंदमान आठवणी तसेच सावरकरांना सरकारने या आधीच भारतरत्न देणे गरजेचे होते मात्र आता त्याची वाट न पहाता आपण त्यांना भारतरत्न सावरकर असेच म्हणणार आहोत असे सांगीतले.
(हेही वाचा – Veer Savarkar Jayanti 2023 : …म्हणून नेहरूंनी सावरकरांवर गांधी हत्येचा खोटा आरोप केला – रणजित सावरकर)
यावेळी हिंदू महासभेचे अध्यक्ष यांनी वीर सावरकरांनी (Veer Savarkar Jayanti 2023) केलेली 41 भाषणे आणि सावरकरांच्या निधनानंतर आचार्य अत्रे यांनी लिहिलेले क्रांतिकारकांचे कुळपुरुष या 19 अग्रलेखांचे संकलन या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले यावेळी उत्तर महाराष्ट्र मेळावा देखील घेण्यात आला.
पुणे, नाशिक, लासलगाव, संगमनेर, त्रंबकेश्वर, बार्शी, ओझर, येथून पदाधिकारी आले होते. कार्यक्रमास पुणे ब्राह्मण महासंघ मैत्रेय पतसंस्था अध्यक्ष लता दवे, प्रदेश समन्वय तृप्ती तारे, वकील आघाडी नाशिक जिल्हा अध्यक्ष विजय कुलकर्णी, नाशिक युवा शहराध्यक्ष संदेश पाठक, महिला शहराध्यक्ष निकिता पाठक, विद्या घटवई, स्मिता कुर्वे,उमेश कुलकर्णी, राहुल आवटी, भाऊ जाखडी, रामचंद्र कळमकर, काळाराम मंदिर विश्वस्त मिलिंद तारे, शालमलि गदगे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community