म्हाडा मुंबई मंडळाच्यावतीने ४,०८३ घरांची लॉटरी सोडत जाहीर करून ऑनलाईन अर्ज नोंदणीला सुरुवात झाली आहे. सोमवारी १४ हजार ९७८ अर्ज नोंदणी झाली असून त्यापैकी ६,८४७ अर्जदारांनी या अर्जासोबतची अनामत रक्कम भरली आहे. त्यामुळे सोमवारपर्यंत एकूण ८० हजार ९४५ ऑनलाईन अर्जांची नोंदणी झाली आहे. तर यापैकी ३१ हजार ६२३ अर्जदारांनी यासाठीची अनामत रक्कम म्हाडाकडे जमा केली आहे.
२२, मे, २०२३ रोजी दुपारी ३.०० वाजल्यापासून ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरुवात झाली असून २६ जून २०२३ रोजी सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याचा पर्याय मंडळातर्फे नागरिकांकरीता खुला राहणार आहे. त्याचबरोबर २६ जून २०२३ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाइन अनामत रक्कमेची स्वीकृती केली जाणार आहे. २८ जून २०२३ रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS / NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येणार आहे. सोडतीसाठी प्राप्त अर्जांची प्रारूप यादी ४ जुलै २०२३ रोजी दुपारी ३ .०० वाजेपर्यंत प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रारूप यादीवर अर्जदारांना ७ जुलै २०२३ पर्यंत हरकती दाखल करता येणार आहे. यानंतर १२ जुलै २०२३ रोजी दुपारी ३.०० वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
(हेही वाचा BMC : महापालिका शाळांचे २०५ विद्यार्थी पोहायला शिकले)
नोंदणी झालेले अर्जदार आणि रक्कम भरलेले अर्जदार
सोमवार २२ मे २०२३
- अर्ज नोंदणी : ६५५
- रक्कम भरलेले अर्जदार : २०८
मंगळवार २३ मे २०२३
- अर्ज नोंदणी : ४२३६
- रक्कम भरलेले अर्जदार : १७००
बुधवार २४ मे २०२३
- अर्ज नोंदणी: ६६१४
- रक्कम भरलेले अर्जदार : २७८०
गुरुवार २५ मे २०२३
- अर्ज नोंदणी : ८६१८
- रक्कम भरलेले अर्जदार : ३७४९
शुक्रवार २६ मे २०२३
- अर्ज नोंदणी : १०,२९२
- रक्कम भरलेले अर्जदार : ४६२२
शनिवार २७ मे २०२३
- अर्ज नोंदणी : १२२०२
- रक्कम भरलेले अर्जदार : ५५०३
रविवार २८ मे २०२३
- अर्ज नोंदणी : १३ ६५०
- रक्कम भरलेले अर्जदार :६२१४
सोमवार २९ मे २० २३
- अर्ज नोंदणी : १४९७८
- रक्कम भरलेले अर्जदार : ६८४७