राज ठाकरेंसोबतच्या भेटीवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले….

205
राज ठाकरेंसोबतच्या भेटीवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
राज ठाकरेंसोबतच्या भेटीवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी रात्री उशीरा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला दादर येथील शिवतीर्थावर गेले होते. रात्री १०च्या सुमारास देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये तब्बल सव्वा तास चर्चा झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. आता राज ठाकरेंसोबतच्या भेटीवर देवेंद्र फडणवीसांनी पहिली प्रतिक्रिया देत या अराजकीय गप्पा असल्याचे ते म्हणाले.

राज ठाकरे यांच्या भेटीसंदर्भात स्पष्टीकरण देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘बऱ्याच दिवसांपासून आमचे ठरले होते की, आपण गप्पा मारायला बसू. आणि सोमवारी तो मुहूर्त निघाला, म्हणून गप्पा केल्या. असे ठरले होते की, राजकीय सोडून गप्पा करायच्या. गप्पा या अराजकीय असतात.’

(हेही वाचा – चालक-वाहकांसाठी मुंबई सेंट्रल येथे वातानुकूलित विश्रांती गृह; दीपक केसरकरांची घोषणा)

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. येत्या सर्व निवडणुका ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवणार आहे. यामुळे भाजप आणि शिवसेनेसमोर तगडे आव्हान असल्याचे बोलले जात आहे. अशातच देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीमागे आगामी महानगरपालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे राजकीय समीकरण दडली असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे. याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह इतर भाजप नेत्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.