कोरोना आता संपूर्ण देशातून हद्दपार होत आहे असे वाटत असतानाच केंद्र सरकारकडून देशवासीयांना पुन्हा एकदा सतर्क करण्यात आले आहे. देशातील कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ नोंदवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारकडून नव्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. श्वास घेण्याचा त्रास, ताप किंवा खोकला ५ दिवसांपेक्षा अधिक काळ असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे केंद्र सरकारने सांगितले आहे.
( हेही वाचा : माहिम किल्ल्यावरील अतिक्रमण हटवले; झोपडीधारकांना विशेष प्रकल्पातंर्गत पर्यायी निवास व्यवस्था)
पुन्हा एकदा मास्क वापरण्यास सुरूवात करावी. सुरक्षित अंतर ठेवावे, शरीराचे तापमान, ऑक्सिजन पातळीचे निरीक्षण करा अशा सूचना केंद्र सरकारमार्फत देण्यात आल्या आहेत. केंद्राने महाराष्ट्रासह, गुजरात, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकला पत्र लिहून अलर्ट राहण्याचा इशारा दिला आहे.
केंद्र सरकारने जारी केलेल्या नव्या सूचना खालीलप्रमाणे…
- श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा सर्दी, खोकला, ताप ५ दिवसांपेक्षा अधिक असेल तर डॉक्टरकडे जा.
- व्हायरल फ्लू आल्यास स्वत: कोणतीही औषधे घेऊ नका.
- कोरोनाशिवाय इतर कोणत्या विषाणूचा संसर्ग आहे का? याची खात्री करा.
- गंभीर लक्षण, उच्च ताप आल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- मास्क वापरा, सुरक्षित अंतर ठेवा, शरीराच्या तापमान व ऑक्सिजन पातळीचे निरीक्षण करावे.