ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता असून, सोलापूरमध्ये राऊतांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी पोलीस ठाण्यात पीडित मुलीचा फोटो ट्विट केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालेला आहे. या फोटोमुळे पीडित मुलीची ओळख समोर आल्यामुळे राऊतांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
( हेही वाचा : सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा सातवा दिवस! सामान्य जनतेची गैरसोय)
बार्शीमध्ये काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला होता. या घटनेतील पीडितेचा फोटो संजय राऊतांनी ट्वीट केला होता. पीडित मुलगी ही अल्पवयीन होती आणि या फोटोमुळे तिची ओळख समोर आल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आगे. संजय राऊत यांच्याविरोधात पोक्सो २३, जुवेनाईल जस्टीस ७४, आयपीसी २२८ अ या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.
संजय राऊतांचे ट्वीट काय होते?
संजय राऊत यांनी पीडित मुलीचा फोटो ट्वीट करत म्हटले होते की, देवेंद्रजी हे चित्र बार्शीतले आहे…मुलगी तुमच्या कुटुंबातील नाही म्हणून तिचे रक्त वाया जाऊ देऊ नका. भाजपा पुरस्कृत गुंडांनी हा जीवघेणा हल्ला केला आहे. अल्पवयीन मुलगी पारधी समाजाची आहे. गरिबांच्या मुली रस्त्यावर पडल्या आहेत ? ५ मार्चला हल्ला झाला आरोपी मोकाट आहेत. असे ट्विट करून राऊतांनी भाजपवर निशाणा साधला होता.
Join Our WhatsApp Community