लंडनमध्ये भारतीय दूतावासाने उच्चायुक्तालयाच्या इमारतीवर तिरंगा फडकवत खलिस्तानी समर्थकांना चांगलीच चपराक बसवली आहे. लंडनध्ये भारतीय उच्चायुक्तालयावर फडकावलेला तिरंगा रविवारी फुटीरवादी खलिस्तानी समर्थकांनी खाली उतरवला होता. याला प्रतिउत्तर म्हणून आता भारतीय दूतावासाने आधीच्या आकारापेक्षा मोठा आणि भव्य असा तिरंगा उच्चायुक्तालयाच्या इमारतीवर फडकवला आहे.
( हेही वाचा : साताऱ्यातील गोळीबाराचे विधानसभेत पडसाद )
भारतीय दूतावासाकडून चपराक
रविवारी खलिस्तानी समर्थकांनी घोषणाबाजी करत भारतीय दूतावासाच्या इमारतीवर हल्ला करत राष्ट्रध्वज खाली उतरवला होता. या घटनेनंतर भारतात संतापाची लाट पसरली होती. दूतावासाच्या इमारतीवर हल्ला करत खलिस्तानी समर्थकांनी तोडफोड केली होती, तसेच राष्ट्रध्वजाचा सुद्धा अपमान करत खलिस्तानी झेंडे फडकवले होते. परंतु आता खलिस्तान्यांना भारतीय दूतावासाने चांगलीच चपराक दिली आहे.
खलिस्तानी समर्थकांनी घातला गोंधळ
आता पूर्वीपेक्षा मोठ्या आकाराचा तिरंगा याठिकाणी लावण्यात आला आहे. भारतात खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंहला पंजाब पोलिसांनी फरार घोषित केले. त्यानंतर त्याच्यावरील अटकेची कारवाई रोखण्यासाठी ब्रिटनमध्ये खलिस्तानी समर्थकांनी गोंधळ घातला.
Join Our WhatsApp Community