NCBचे माजी संचालक समीर वानखेडे भाजपच्या वाटेवर?

119

महाविकास आघाडी सरकारच्या काळात बहुचर्चित अशा कॉर्डिलिया क्रुझ प्रकरण ज्यांच्यामुळे उघडकीस आलं, ते म्हणजे अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे, हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना सध्या जोरदार उधाणं आलं आहे. रविवारी, १९ मार्चला समीर वानखेडे यांनी पत्नी क्रांती रेडकर यांच्यासोबत नागपूरच्या रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली होती. त्यामुळे सध्या समीर वानखेडे भाजपमध्ये जाणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान क्रांती रेडकर यांनी केशव हेडगेवार आणि गोळवलकर यांच्या समाधीवर जाऊन फुलं वाहिल्याचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. याच व्हिडिओवरून सध्या राजकीय वर्तुळात समीर वानखेडे भाजपच्या वाटेवर असल्याचं म्हटलं जात आहे.

यापूर्वीही गतवर्षी समीर वानखेडेची राजकारण एंट्री होणार असल्याची चर्चा रंगली होती. याचं कारण होत एक जाहिरात. दिवाळीच्यानिमित्तानं एका वृत्तपत्राच्या वाशिम आवृत्तीमध्ये समीर वानखेडे आणि पत्नी क्रांती रेडकर यांची शुभेच्छा देणारी जाहीर प्रसारित झाली होती. यामध्ये वानखेडे परिवाराकडून वाशिम जिल्ह्यातील सर्व नागरिक आणि शेतकऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या होत्या. तेव्हाही समीर वानखेडे राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर आता समीर वानखेडे यांनी सहपत्नी भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिल्यानं भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान राजकीय जाणकारांच्या मतानुसार, वाशीम हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असल्यानं समीर वानखेडे हे वाशीम जिल्ह्यातून निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात.

(हेही वाचा – जितेंद्र आव्हाडांच्या सनातन धर्मावरील वादग्रस्त विधानावर बावनकुळे संतापले; म्हणाले…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.