कुलाबा-सीप्झ मेट्रो वर्षाखेरीस धावणार! ‘या’ २६ स्थानकांवर असणार थांबा

150

मुंबईत उड्डाणपूल आणि मेट्रो सेवेचे जाळे वेगाने पसरत आहे. सीप्झ-कुलाबादरम्यानची मेट्रो सेवा डिसेंबर २०२३ पर्यंत जनतेसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार, या मार्गावरील २६ स्टेशनपैकी २१ स्थानकांचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे.

( हेही वाचा : अनिल जयसिंघानीनंतर संजय पांडे आणि आणखीन एका पोलीस अधिकाऱ्याचा काऊंटडाऊन सुरू; मोहित कंबोज यांचे ट्वीट )

विधान भवन मेट्रो स्टेशनचे काम ९३ टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले असून एमआयडीसी स्थानकाचे काम ९६ टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. या वर्षात कारशेडचे काम पूर्ण होऊ शकत नसल्याने एमएमआरसीएलने सीप्झ ते बीकेसीपर्यंत ९ रेकसह मेट्रो सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. डिसेंबर २०२३ मध्ये मेट्रो सेवा सुरू करण्याआधी प्रत्यक्ष वेगाने चाचण्या करण्यात येणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या या २०२४ पर्यंत पूर्ण केल्या जाणार आहेत. सध्या मेट्रो ३ चे काम प्रगतिपथावर आहे.

अशी असतील स्थानके

  1. कफ परेड
  2. विधानभवन
  3. चर्चगेट
  4. हुतात्मा चौक
  5. सीएसएमटी
  6. काळबादेवी
  7. गिरगाव
  8. ग्रॅंट रोड
  9. मुंबई सेंट्रल
  10. महालक्ष्मी
  11. सायन्स म्युझियम
  12. आचार्य अत्रे चौक
  13. वरळी
  14. सिद्धिविनायक
  15. दादर
  16. शितलादेवी
  17. धारावी
  18. बीकेसी
  19. विद्यानगरी
  20. सांताक्रुझ
  21. सीएसएमआयए (टी१)
  22. सहार रोड
  23. सीएसएमआय (टी२)
  24. मरोळ नाका
  25. एमआईडीसी
  26. सीप्झ
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.