गाढव हा प्राणी नेहमी दुर्लक्षित राहिलेला आहे. अक्कल नसलेला ओझे वाहून नेणारा प्राणी म्हणून त्याची ओळख आहे. एखाद्याला मूर्ख, ढ म्हणायचं असेल तर त्याला आपण गाढव म्हणतो. बिचारा इतका अपमान सहन करणारा दुसरा प्राणी या जगात नसेल. पण याच गाढवाची किंमत लाखो रुपये आहे असं जर तुम्हाला कुणी सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का?
हा चमत्कार महरी यात्रेत घडतो. महाराष्ट्राच्या पाथरडी तालुक्यातून या यात्रेला सुरुवात होते. नाथ सांप्रदायातील भक्तांसाठी तर ही पर्वणी असते. कानीफनाथांच्या प्रसादाची तयारी स्वतः भक्त करतात. या यात्रेतील एक वेगळं आकर्षण म्हणजे या यात्रेत गाढव आणि इतर प्राणी विक्रीसाठी ठेवले जातात.
(हेही वाचा काँग्रेसच्या खोडसाळपणाचा भाजपच्या नेत्यांनी घेतला खरपूस समाचार)
गाढवांची संख्या कमी कमी होत असल्या करणाने त्यांची किंमत वाढली आहे. विशेष म्हणजे या जत्रेत कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात या राज्याचे व्यापारी येतात. यंदा काठेवाडी गाढवाची मागणी मोठ्या प्रमाणात होती. तसेच पंजाबी संकर गाढव सुद्धा विक्रीसाठी होते. आणि या गाढवांची किंमत १ लाख किंवा त्यापेक्षा जास्त होती.
काठेवाडी गाढवांची विक्री मोठ्या प्रमाणात झाली. इतर प्राण्यांपेक्षा गाढवाची किंमत जास्त का असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र गाढवांची संख्या कमी होत असल्यामुळे त्यांची किंमत वाढली आहे. आता गाढव नामशेष होण्याआधी सरकारने यावर गांभिर्याने विचार केला पाहिजे.
Join Our WhatsApp Community