भारतीय रेल्वेचे खासगीकरण होणार की नाही? केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्टचं सांगितले…

114

भारतीय रेल्वेचे खासगीकरण करणार नसल्याचे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. एका खासगी मुलाखतीत त्यांनी रेल्वेचे खासगीकरण करणार नसल्याचा पुनरूच्चार केला आहे. यापूर्वी गेल्यावर्षी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात रेल्वे मंत्र्यांनी खासगीकरणार नाही असे स्पष्ट केले होते.

( हेही वाचा : वीजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि जोरदार पाऊस! हवामान खात्याने दिला अलर्ट )

रेल्वेच्या कारभारात आणि सेवेत पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्न 

रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव म्हणाले की, भारतीय रेल्वेची सेवा फार मोठी आणि भारताची सर्वात मोठी आर्थिक शक्ती ही रेल्वे आहे. त्यामुळे या सेवेचा खाजगीकरण करण्याचा आमच्या सरकारचा कोणताही हेतू नाही. भारतीय रेल्वेचे खाजगीकरण कोणत्याही स्थितीत केले जाणार नाही, असे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले आहे. रेल्वेच्या खाजगीकरणाबाबतच्या चर्चा आता जुन्या झाल्या आहेत. रेल्वे ही आपली आणि सरकारची सामाजिक बांधिलकी आहे. रेल्वेच्या कारभारात आणि सेवेत पारदर्शकता आणण्यासाठी आमचे सरकार प्रयत्न करत असल्याचे रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

भारतीय रेल्वेच्या विकासाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फार खोलवर विचार करतात. अनेक शहरांमध्ये नव्या रेल्वे लाईन्स सुरू करण्याचा आमच्या सरकारचा विचार आहे. याशिवाय वंदे भारत एक्सप्रेसच्या माध्यमातून देशातील अनेक शहरे जोडली गेलेली आहे. आगामी काळात रेल्वेच्या विकासासाठी मोदी सरकार कटिबद्ध असून अनेक नव्या योजनांवर काम केले जाणार असल्याचेही रेल्वेमंत्री वैष्णव यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.