हिंदू धर्माचे नवीन वर्ष गुढीपाडव्यापासून सुरू होते. महाराष्ट्रात हा सण उत्साहात साजरा केला जातो. तथापि, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक राज्यांमध्ये हा दिवस उगादी किंवा युगादी म्हणून साजरा केला जातो. तर सिंधी हिंदू हा दिवस चेट्टी चंदच्या नावाने साजरा करतात.
( हेही वाचा : मुंबईतील वाहतुकीत पाच महिन्यांसाठी मोठे बदल! पर्यायी मार्ग पाहून करा प्रवासाचे नियोजन)
नवरात्रीची सुरुवातही याच दिवशी होते. त्याचबरोबर शेतकरी पिकांची पेरणीही करतात. या दिवशी सूर्योदयापासूनच पूजा सुरू होते. गुढीपाडव्याची तारीख, शुभ वेळ आणि महत्त्व याविषयी आवश्यक माहिती जाणून घेऊया.
हिंदू कॅलेंडरनुसार, गुढीपाडवा हा चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो. या वर्षी ही तारीख २२ मार्च, बुधवारी असेल. २२ मार्च रोजी गुढीपाडवा हा सण साजरा केला जाणार आहे. दुसरीकडे, पूजा मुहूर्ताबद्दल बोलायचे तर, गुढीपाडव्याच्या पूजेचा शुभ मुहूर्त २२ मार्च रोजी सकाळी ६.२९ ते ७.३९ पर्यंत असणार आहे.
गुढीपाडव्याचे महत्त्व
- या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली होती आणि हा दिवस ब्रह्मपूजेसाठी समर्पित मानला जातो.
- या दिवसापासून नवरात्रीची सुरुवात होते आणि प्रत्येक घरात माता दुर्गेची पुजा केली जाते.
- या दिवशी शेतकरी नवीन पिके घेतात.
- या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय घुसखोरांवर विजय मिळवला होता. विजयाच्या आनंदात शिवाजी
- महाराज आणि त्यांच्या सैन्याने ‘गुड्डी’ उभारली.