गुढीपाडवा २०२३ : लखनौ येथील चौहरा चौकात उभारण्यात आली गुढी!

114

हिंदु नववर्षाच्या निमित्ताने उत्तर प्रदेश मराठी समाज आणि इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने लखनौ येथील चौहरा चौकात गुढी उभारून ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाद्वारे विविधतेतून एकता तसेच मराठी संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडले. यावेळी सर्व उपस्थितांनी “जय भवानी जय शिवाजी” असा नारा देत या नववर्षानिमित्त सुख, समृद्धी आणि भरभराटीच्या शुभेच्छा दिल्या.

( हेही वाचा : जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री! शिवसेना भवनसमोर मनसेची बॅनरबाजी)

या कार्यक्रमात मराठी समाज उत्तर प्रदेशचे संस्थापक तसेच इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स चौकाचे अध्यक्ष उमेश पाटील, भाजपा नेते अन्नू मिश्रा, मनोज अग्रवाल, पवन अग्रवाल, आनंद रस्तोगी, अजय रस्तोगी, गजानन पाटील, पांडुरंग राऊत, भानुदास पाटील, सचिन माळी, दिलीप धनवडे, जयचंद पाटील, सुनील मोरे आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी लखनौ, उत्तर प्रदेश आणि भारताच्या सुख-समृद्धीसाठी देवाकडे प्रार्थना करण्यात आली. पुणे महाराष्ट्रातून आलेल्या पर्यटकांनी हा कार्यक्रम पाहिल्यावर त्यांनीही कार्यक्रमात सहभागी होऊन गुढीची पूजा केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.