मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची चर्चा सुरू होती. अखेर शिंदेंच्या अयोध्या दौऱ्याची तारीख ठरली आहे. माहितीनुसार, ६ एप्रिलला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येच्या दौऱ्याला जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत शिवसेनेचे आमदार, खासदारही अयोध्येत जाणार आहेत. अयोध्येत जाऊन रामललाचे दर्शन घेणार आहेत.
दरम्यान शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचे जाहीर केले होते. तसेच सरकार स्थापनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या झालेल्या पहिल्या दसरा मेळाव्याला अयोध्येचे काही महंत आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदेंना महंतांनी अयोध्येच्या दौऱ्याचे आमंत्रण दिले होते. त्यानुसार हनुमान जयंतीनिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ६ एप्रिलला अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे आमदार, खासदारही असणार आहेत. अयोध्येच्या दौऱ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रामललाचे दर्शन घेऊन शरयू नदीवर आरती करणार आहेत.
(हेही वाचा – मुख्यमंत्री शिंदेंनी मनसे कार्यालयाला भेट दिल्यानंतर शिवसेना-मनसे युतीच्या चर्चेला उधाण)
Join Our WhatsApp Community