Earthquake in Delhi: दिल्लीत पुन्हा भूकंपाचे धक्के

135

सलग दुसऱ्या दिवशी राजधानी दिल्लीत भूकंपाचे धक्के जाणवले. बुधवारी सायंकाळी ४.४२ मिनिटांनी दिल्लीत हे भूकंपाचे धक्के बसले असून या भूकंपाचे धक्के २.७ रिश्टर स्केल इतके होते.

https://twitter.com/NCS_Earthquake/status/1638503803665149953?t=W7v09mKwjfnchEclFatNjQ&s=08

दरम्यान मंगळवारी २१ मार्चला दिल्लीत रात्री १०.१७ मिनिटांनी भूकंपाचे तीव्र झटके जाणवले होते. या भूकंपाचे केंद्रस्थान अफगाणिस्तानमधील हिंदू कुश क्षेत्र होते.

https://twitter.com/ANI/status/1638224023719911433?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1638224023719911433%7Ctwgr%5E9adbe6abb6a038278f4379eecb941412b31f6971%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.abplive.com%2Fnews%2Findia%2Fearthquake-in-delhi-ncr-shock-waves-felt-across-noida-earthquake-latest-marathi-news-update-1161726

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, अफगाणिस्तानातील भूकंपाची तीव्रता ६.६ इतकी मोजली गेली. भूकंपाचे केंद्र फैझाबादहून १३३ किमी दूर दक्षिण पूर्व हिंदू कुश क्षेत्र होते. तसेच भूकंपाचे केंद्र १५६ किमी खोलवर होते. दरम्यान भूकंपाचे झटके भारता व्यतिरिक्त तुर्कमेनिस्तान, कझाकिस्तान, पाकिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, चीन, अफगाणिस्तान आणि किर्गिस्तानमध्येही जाणवले होते.

दरम्यान भारतात दिल्ली-एनसीआर व्यतिरिक्त हरियाणा, उत्तर प्रदेश, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, मध्य प्रदेश, उत्तराखंडमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. यावेळी लोकं घराबाहेर पडले होते. भूकंपाचे इतर धक्के जाणवण्याच्या भीतीने अनेक जण रात्री उशिरापर्यंत घराबाहेर उघड्यावरच थांबले होते.

अफगाणिस्तानमध्ये २ तर पाकिस्तानमध्ये ९ जणांचा मृत्यू

या भूकंपामुळे अफगाणिस्तानमध्ये २ जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती अफगाणिस्तानच्या आपत्ती निवारण मंत्रालयाचे प्रवक्ते शफीउल्लाह रहीमी यांनी दिली. ते म्हणाले की, पूर्व लघमान प्रांतात २ जण ठार झाले आहेत. बदख्शान आणि इतर उत्तरेकडील भागात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पाकिस्तानातील भूकंपाची तीव्रता ६.८ एवढी असल्याचे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. स्थानिक माध्यमानुसार, पाकिस्तानमध्ये भूकंपामुळे ९ लोकांचा मृत्यू झाला, तर १६०हून अधिक लोकं जखमी झाले आहेत. मृतांमध्ये २ महिलांचाही समावेश आहे.

(हेही वाचा – मालगाडीचे कपलिंग तुटल्याने २८ डब्बे झाले वेगळे; रेल्वे वाहतुकीचा एक तास खोळंबा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.