पंतप्रधान मोदींविरोधात पोस्टरबाजी केल्याप्रकरणी ६ जण ताब्यात, तर १००हून अधिक जणांवर FIR दाखल

134

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्टरबाजी करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी १००हून अधिक एफआयआर नोंदवले असून ६ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दिल्लीचे राजकारण करणाऱ्या एक पक्ष या पोस्टरबाजीत असल्याची माहिती पुढे आली आहे.

दिल्ली शहराच्या विविध भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात पोस्टर्स लावण्यात आले आहेत. यात “मोदी हटाओ देश बचाओ” अशी आक्षेपार्ह शेरेबाजी करण्यात आली आहे. दरम्यान पोस्टर बनवल्यावर त्या पोस्टरवर छापखान्याचा नंबर दिला जातो. मात्र या पोस्टरवर कोणताही नंबर दिलेला नाही. परंतु, या पोस्टरवर लिहिलेल्या आशयाचे आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग यांनी बुधवारी सकाळी ट्विट केले होते. याप्रकरणी पोलिसांनी ६ जणांना ताब्यात घेतले असून चौकशीत त्यांनी दिल्लीतील एका राजकीय पक्षाचे नाव घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दिल्लीत सध्या १०० ठिकाणी पोस्टर्स लागले आहेत. परंतु, राजकीय पक्षाने ५ हजार पोस्टर्स छापल्याची माहिती पुढे आली असून पोलीस त्यानुषंगाने तपास करीत आहेत.

(हेही वाचा – नितीन गडकरी धमकी प्रकरणात मंगळुरुमधून तरुणी ताब्यात; नागपूर पोलिसांचे पथक बेळगावला रवाना)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.