गेल्या गुढी पाडव्याला मी सांगितले होते, मशिदीवरील भोंगे बंद करा, त्यावरून गेल्या सरकारमध्ये माझ्या मनसैनिकांवर १७ हजार गुन्हे दाखल झाले, ते मागे घ्या आणि दुसरे एक तर तुम्ही मशिदींवरील भोंगे बंद करण्यास सांगा किंवा आमच्याकडे दुर्लक्ष करा, दोनपैकी तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल, आम्ही स्पीकर बंद करू, मी मुद्दाम यासाठी मुख्यमंत्री यांना भेटणार आहे. राज्यात अनधिकृतपणे काही गोष्टी उभ्या राहत आहेत त्याकडे लक्ष द्या, असे सांगणार आहे, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा दिला. छत्रपती शिवाजी महाराज उद्यान (शिवाजी पार्क) येथे मनसेच्या गुढी पाडव्याच्या निमित्ताने आयोजित सभेत राज ठाकरे बोलत होते.
मला जावेद अख्तर यांच्यासारखे मुसलमान पाहिजेत. त्यांनी पाकिस्तानात जाऊन त्यांनाच झोडपले. त्यांच्या लोकांमध्ये जाऊन त्यांना सुनावले, अशी माणसे मला हवी आहेत. सांगलीमधून एक पत्र मला आले. मंगलमूर्ती कॉलनीतील, सांगली-कुपवाडा येथील रहिवाशांचे ते पत्र आहे. त्यात कॉलनीतील एका प्लॉटवर खेळाचे आरक्षण असताना त्यावर काही मुसलमानांनी बनावट कागदपत्रे बनवून तो प्लॉट ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, त्याला विरोध केला तर त्यांनी स्थानिक नागरिकांना धमकावण्यास सुरुवात केली, त्यांना त्रास देणे सुरु केले. आता तिथे बेकायदेशीर मशीद बांधण्याचा प्रयत्न सुरु केला, पोलीस याची दाखल घेत नाहीत. आता राज्याच्या सत्तेवर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आले, तेव्हा त्यांनाही प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेले अनधिकृत बंधकाम तोडले त्याचे स्वागत आहे. आज मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे शिवसेना हे नाव आहे, धनुष्यबाण चिन्ह आहे. मला इतकेच सांगायचे आहे, त्यांनी या बेकायदा बांधकामांकडे दुर्लक्ष करू नये, असे राज ठाकरे म्हणाले.
(हेही वाचा राज ठाकरेंनी सभेत दाखवला माहीमच्या समुद्रातील बेकायदा दर्गा; कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांना दिला अल्टिमेटम )
६ जूनला रायगडावर जाणार
येत्या ६ जूनला शिवरायांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत, मी स्वतः रायगडावर जाणार आहे, तुम्हीही या. हिंदूंनी दक्ष रहावे, आज बेसावध रहाल तर पायाखालची जमीन कधी सरकेल हे समजणार नाही. एप्रिलमध्ये कोकणातील उरलेल्या दोन सभा घेणार आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.
Join Our WhatsApp Community