वीर सावरकरांचा अवमान करणा-या राहुल गांधींना जोडे मारले; पण ‘शिदोरी’वर कारवाई कधी?

147

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्या राजकीय पक्षांचे बेगडी हिंदुत्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. वीर सावरकरांची बदनामी करणाऱ्या ‘शिदोरी’ मासिकवर कारवाईची मागणी २०२० पासून सातत्याने केली जात असताना तत्कालीन मुख्यमंत्र्यांसह विद्यमान सत्ताधाऱ्यांनीही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याची माहिती समोर आली आहे.

savarkar 3

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे मुखपत्र असलेल्या ‘जनमानसाची शिदोरी’ या मासिकाच्या फेब्रुवारी २०२० च्या अंकात ‘स्वातंत्र्यवीर नव्हे, माफीवीर’ आणि ‘अंधारातील सावरकर’ असे दोन लेख छापण्यात आले. अत्यंत विकृत मनोवृत्तीने लिहिलेले आणि शंभर टक्के असत्यावर आधारित, वस्तुस्थितीचा विपर्यास करणारे हे लेख सावरकरांची मानहानी करणारे आहेत. त्यात ज्या द वीक मासिकातील लेखांचा संदर्भ देण्यात आला आहे त्याबाबत ‘द वीक’ ने माफी मागितली आहे.

(हेही वाचा वीर सावरकरांचा अवमान: राहुल गांधींच्या फोटोला भाजपच्या आमदारांनी विधिमंडळ परिसरात मारले जोडे)

हिंदूंच्या हृदयात ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना अढळ स्थान आहे, ज्यांना प्रत्यक्ष शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आदर्श मानत होते, त्या सावरकरांचा अपमान हा बाळासाहेबांसकट समस्त हिंदूंचा अपमान आहे. त्यामुळे बाळासाहेबांचे सुपुत्र मुख्यमंत्री असताना ‘शिदोरी’ मासिकवर कारवाई होईल, अशी आशा सावरकर प्रेमींना होती. मात्र ती फोल ठरली.

सावरकरप्रेमींकडून नाराजी

  • स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने १३ फेब्रुवारी २०२० रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यासंदर्भात पत्रही देण्यात आले. या मासिकावर त्वरित बंदी घालून, लेख लिहिणाऱ्या लेखकांना आणि ते छापणाऱ्या संपादकांना अटक करावी, अशी मागणी त्यातून करण्यात आली. मात्र, ठाकरेंनी काँग्रेसच्या मुखपत्रावर कोणतीही कारवाई केली नाही.
  • त्यानंतर हिंदुत्त्वाचा आधार घेऊन स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारकडून या प्रकरणाची दखल घेतली जाईल, अशी आशा सावरकरप्रेमींना होती. मात्र, राज्यात हिंदुत्त्ववादी सरकार येऊन ९ महिने लोटले, तरी अद्याप शिदोरी मासिकवर कोणतीही कारवाई झालेली नाही. किंबहुना त्यांना नोटीसही पाठवण्यात आली नाही. त्यामुळे सावरकरप्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.