मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या दिवशी जाहीर सभेत माहीम आणि सांगली येथे मुसलमानांकडून दर्गा आणि मशिदीच्या नावाने अतिक्रमण होत असल्याचा मुद्दा मांडून हिंदूंना सतर्क होण्याचे आवाहन केले. त्यानंतर प्रशासनही सतर्क झाले आणि दुसऱ्या दिवशी माहीम आणि सांगली येथील अतिक्रमण हटवण्यात आले. मात्र यानंतर आता राज्यभरात ठिकठिकाणी इस्लामी अतिक्रमणाच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटना एकवटू लागल्या.
गुरुवारी, २३ मार्च रोजी मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी ठाणे पोलिसांना मुंब्रा येथील बेकायदा मशिदींची यादी दिली. तसेच पोलिसांनी तात्काळ हे अतिक्रमण हटवावे अन्यथा मनसे स्टाईलने ते अतिक्रमण हटवण्यात येईल, असा इशारा दिला. आता माहीममध्ये सुरू झालेल्या दर्ग्याच्या वादाचे लोण आता नाशिकपर्यंत येऊन पोहचले आहे, नाशिकच्या पेशवेकालीन नवशा गणपती मंदिरासमोर असलेल्या दर्ग्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून हे अतिक्रमण मंदिराच्या आवारापर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे हे अतिक्रमण हटवावे, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांचे नेते सुरेश चव्हाणके यांनी केली. इतकेच नाही तर त्यांनी या नवशा गणपती मंदिरात आरती करून शेजारी असलेल्या दर्ग्याच्या अतिक्रमणाची पाहणी देखील केली आणि हे अतिक्रमण हटवण्याची मागणी केली. नाशिकच्या नवशा गणपती मंदिराला लागून असलेल्या दर्ग्याच्या आजूबाजूला अतिक्रमण असल्याचा दावा हिंदुत्ववादी संघटनांनी केल्यानंतर पालिका प्रशासनाने देखील कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. अतिक्रमण हे अतिक्रमण असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा गर्भित इशारा पालिका आयुक्तांनी दिला आहे.
(हेही वाचा राज ठाकरेंच्या भाषणानंतर सांगलीतील बेकायदा मशिदीवरही पडणार हातोडा)
Join Our WhatsApp Community