जगभरातील चर्चवर धार्मिकदृष्ट्या नियंत्रण असलेल्या व्हॅटिकनच्या धार्मिक संस्कार मंडळाने समलैंगिक दाम्पत्यांना आशीर्वाद दिला जाणार नाही, कारण धर्मात ठरवून दिलेल्या नियमांच्या ते विरोधात आहे, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे एकप्रकारे पाश्चात्य ख्रिस्ती देशांसाठी हा मोठा धक्का समजला जात आहे. मात्र याला अमेरिका आणि पश्चिम युरोपातून विरोध होऊ लागला आहे.
जगभरात ख्रिस्ती धर्मामध्ये विवाह संस्कारासाठी चर्चची भूमिका महत्वाची मानली जाते. पाद्री, बिशप यांच्या आशिर्वादाशिवाय विवाहाला मान्यता मिळत नाही. अशावेळी अमेरिकासह युरोपातील देशांमध्ये समलैंगिक समुदायाची संख्या वाढत चालली आहे. त्याचा पुढचा टप्पा म्हणून आता ते त्यांच्या नात्याला विवाहात बांधण्यासाठी तशी त्या त्या देशांच्या सरकारांना गळ घालत आहेत. अशा परिस्थिती आता व्हॅटिकननेच या प्रकारच्या संबंधांना नाकारल्याने पाश्चिमात्य देशामंध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
कुठे समर्थन, तर कुठे विरोध!
सध्या अमेरिका आणि पश्चिम युरोपात समलैंगिक संबंधांना मान्यता देण्यात आली आहे, तसेच अमेरिका, जर्मनी आणि पॅरिस येथील चर्च समलैंगिक दाम्पत्यांना आशीर्वाद देतात, मात्र पूर्व युरोप, आफ्रिका आणि आशियातील चर्चमध्ये याला मान्यता नाही. व्हॅटिकनच्या या भूमिकेमुळे जगभरातील १.३० अब्ज लोकसंख्या असलेल्या ख्रिस्ती धर्मियांसाठी आता ही एकप्रकारे मर्यादा समजली जाणार आहे.
(हेही वाचा : पाकिस्तानी ‘ललना’च्या जाळ्यात सापडला आणखी एक भारतीय जवान! )
काय म्हणाले व्हॅटिकनचे पोप फ्रान्सिस?
- विवाहाच्या संबंधी पूर्वपार काही नियम ठरवण्यात आले आहेत, त्यामध्ये समलैंगिक दाम्पत्यांसाठी ढवळाढवळ करता येणार नाही.
- हा कोणताही भेदभावाचा मुद्दा नाही, तर विवाहसंबंधी ठरवून दिलेल्या धार्मिक संस्कारांचा विषय आहे.
- पुरुष आणि स्त्री यांच्या विवाहाला धर्मानुसार मान्यता देण्यात आली आहे, समलैंगिकांसाठी नाही.
- अमेरिका आणि जर्मनी येथील काही कॅथॉलिक चर्चने समलैंगिक विवाहासाठी आशीर्वाद देण्यास सुरुवात केली आहे, त्यांना तो अधिकार देण्यात आला नाही.
- कोणत्याही चर्चमध्ये समलैंगिक दाम्पत्यांना दिलेला आशीर्वाद हा धार्मिकदृष्ट्या ग्राह्य धरला जाणार नाही.
- त्याचबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारे, विवाहबाह्य संबंध ठेवणार यांनाही त्यांच्या एकत्रित जीवनासाठी आशीर्वाद देण्याची परवानगी धर्मात नाही.
२०१३मध्ये पॉप फ्रान्सिस यांनी समलैंगिकांचे केलेलं समर्थन?
- व्हॅटिकनचे पॉप फ्रान्सिस यांनी २०१३ मध्ये समलैंगिक संबंधाचे समर्थन केले होते, असा दावा समलैंगिक समुदाय करत आहे.
- समलैंगिकांबाबत मत मांडणारा मी कोण आहे?, असे पॉप फ्रान्सिस म्हणाले होते.
- समलैंगिकांना स्वतःचे कुटुंब निर्माण करण्याचा अधिकार आहे.
- ते देवाचीच मुले आहेत, त्यामुळे त्यांना त्यांची कुटुंब बनवण्याचा अधिकार आहे. त्यांना कुणीही मुख्य सामाजिक धारेतून दूर करू शकत नाही.
- त्यानंतर व्हॅटिकनने याचा खुलासा करताना, पॉप फ्रान्सिस यांची विधाने तोडूनमोडून प्रसिद्ध करण्यात आली. त्यांनी समलैंगिक संबंधांना मान्यता दिलेली नाही.
The Vatican’s decision not to bless LGBTQ+ couples is based on the rules they’ve chosen to guide the Catholic Church.
Affected couples have the right to belong to somewhere else that fits thier beliefs better.
The Pope forces no one to be Catholic.
— First Doctor (@firstdoctorr) March 16, 2021
कोणी केला व्हॅटिकनला विरोध?
- गे कॅथॉलिक ग्रुपचे संचालक फ्रान्सिस बेनार्डो यांनी याला विरोध केला आहे. व्हॅटिकनची ही भूमिका आम्हाला अपेक्षित होती, व्हॅटिकनने समलैंगिक समुदायाचे हक्क नाकारणे अत्यंत खेदजनक आहे, असे बेनार्डो म्हणाले.
- डिग्निटी यूएसए संघटनेच्या संचालिका मरिना बुर्के म्हणाल्या की, व्हॅटिकनने समलैंगिक संबंध नाकारल्याबद्दल आम्ही नाराजी व्यक्त करतो, व्हॅटिकनची ही भूमिका आमच्यासाठी केवळ निराशाजनक नाही, तर संतापजनकही आहे.
- आमची निर्मिती स्वतः केली नाही, देवानेच आम्हाला तसे घडवले आहे, आमचा जन्मच मुळात त्या पद्धतीने झाला आहे. त्यामुळे व्हॅटिकन असो किंवा अन्य धर्मियांनी यादृष्टीने विचार करणे गरजेचे होते.
Join Our WhatsApp Community🏳️🌈 Love is love.
💍 Gay marriage is legal.
👋 The Pope isn’t your County Clerk.
🍷 Register for the fancy sheets and wine glasses.
❤️ Peace and blessings. pic.twitter.com/WNuKQOQujm— Chasten Glezman Buttigieg (@Chasten) March 15, 2021