राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांना मनी लॉंड्रिंग प्रकरणी ईडीकडून नवे समन्स बजावण्यात आले आहे. मनी लॉंड्रिंग प्रकरणात २४ मार्च रोजी हसन मुश्रीफांचा जबाब नोंदवण्यासाठी ईडीकडून चौकशी केली जाणार आहे.
( हेही वाचा : देशात वनांचे आच्छादन वाढले; भारतीय वनस्थिती अहवाल प्रसिद्ध )
यापूर्वी सुद्धा हसन मुश्रीफांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. यावेळी त्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांकडे पत्र दिले होते. या पत्रात चौकशी दरम्यान काही मागण्या केल्या होत्या. त्यांच्या या मागण्या ईडीकडून मान्य करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. यावेळी त्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांकडे पत्र दिले होते. या पत्रात चौकशी दरम्यान काही मागण्या केल्या होत्या. त्यांच्या या मागण्या ईडीकडून मान्य करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. ईडीकडून गेल्या दीड महिन्यापासून हसन मुश्रीफ यांच्याविरोधात कारवाई केली जात आहे.
नेमके प्रकरण काय ?
संताजी घोरपडे साखर कारखान्यातील घोटाळ्याप्रकरणी मुश्रीफ यांच्या घरावर धाड पडली होती. कोलकात्यातील बोगसकंपन्यांमधून 158 कोटी रुपये या कारखान्यात ट्रान्स्फर झाले होते. हा पैसा आला कुठून? ही कंपनी आहे कुठे? हा मनी लॉन्ड्रिंगचा पैसा आहे, असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. तसेच, याप्रकरणी मुश्रीफ यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही सोमय्या यांनी केली होती. त्यानंतर आयकर विभाग आणि ईडीने मुश्रीफ यांच्याविरोधात कारवाईस सुरुवात केली होती.
Join Our WhatsApp Community