यंदाच्या आशिया कपचे यजमानपद पाकिस्तानकडे असणार आहे. यापूर्वी BCCI ने पाकिस्तानात भारतीय संघ जाणार नाही अशी भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळेच भारतीय संघ यात सहभागी व्हावा यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड विशेष योजना करत आहे. या योजनेनुसार भारतीय क्रिकेट संघाला ही स्पर्धा खेळण्यासाठी पाकिस्तानात जाण्याचीही गरज भासणार नाही.
( हेही वाचा : राहुल गांधींची खासदारकी रद्द, लोकसभा सचिवालयाची मोठी कारवाई )
आशिया कप स्पर्धेचे यजमानपद स्वत:कडे ठेवण्यासाठी पीसीबीने नवा उपाय शोधला आहे. भारतीय क्रिकेट संघ युएई, ओमान, श्रीलंका किंला इंग्लंड यापैकी कोणत्याही एका देशात आपले सामने खेळू शकणार आहे. आशिया कपमध्ये टीम इंडियाचे सामने कुठे होणार हे अद्याप निश्चित झालेले नाही.
यासंदर्भात अहवाल प्रसिद्ध करण्यात आला असून भारतीय क्रिकेट संघाच्या सामन्यांचे ठिकाण ठरवण्यासाठी हवामानाची सुद्धा विशेष काळजी घेतली जाणार आहे असे पीसीबीने याद्वारे म्हटले आहे. आशिया कप यावर्षी सप्टेंबरमध्ये खेळवण्यात येणार आहे.
आशिया चषक स्पर्धेत यावेळी एकूण १३ सामने
आशिया चषक स्पर्धेत यंदा केवळ ६ टीम सहभागी होणार असून टीम इंडिया, पाकिस्तान, गजविजेता संघ श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि एक क्वालिफायर टीमचा यात समावेश असेल. या सर्व टीम दोन गटांमध्ये विभागल्या जाणार आहेत. दोन्ही गटांतर्गत ६ टीममध्ये एकूण ६ सामने खेळवले जाणार आहेत.
Join Our WhatsApp Community