राहुल गांधींची खासदारकी घालवणारे गुजरातचे भाजप आमदार कोण?

253

२०१९ साली लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी राहुल गांधींनी सर्व चोरांची आडनाव मोदी कशी काय असतात? असा सवाल करणं त्यांना चांगलंच महागात पडलं आहे. गुरुवारी गुजरातमधील सुरत जिल्हा आणि सत्र न्यायालयानं राहुल गांधींना २ वर्षांनी शिक्षा सुनावल्यानंतर आता राहुल गांधींची खासदारकी रद्द केली आहे. याबाबत लोकसभा सचिवालयानं निर्णय घेतला असून यामुळे काँग्रेसला खूप मोठा झटका बसला आहे. दरम्यान सध्या राहुल गांधींवर मानहानीचा खटला दाखल करणारे गुजरातचे भाजप आमदार पूर्णेश मोदी यांची जोरदार चर्चा सुरू आहे. हे पूर्णेश मोदी कोण आहेत? जाणून घ्या.

गुजरातमधील सुरतला हिऱ्यांचं शहर म्हटलं जात. या सुरतमध्ये पूर्णेश मोदी यांचा २२ ऑक्टोबर १९६५ साली जन्म झाला. सुरत पश्चिम येथील पूर्णेशे मोदी भाजप आमदार आहे. त्यांच्याकडे बी.कॉम आणि एलएलबी पदवी असून ते पेशानं वकील आहेत. तसेच ते गुजरात सरकारमध्येही मंत्री राहिले आहेत.

२०१३ साली सूरत पश्चिम येथील भाजप आमदार किशोर भाई यांचं प्रदीर्घ आजारानं निधन झालं होत. किशोर भाई यांच्या निधनानंतर भाजपनं पोटनिवडणुकीत पूर्णेश मोदी यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली. ही पोटनिवडणूक जिंकून पूर्णेश मोदी भाजप आमदार झाले. त्यानंतर २०१७ साली पुन्हा विधानसभा निवडणुकीत भाजपनं पूर्णेश यांना तिकिट दिलं आणि ते पुन्हा भरघोस मतांनी निवडणूक आले. २०१७च्या निवडणुकीत पुर्णेश मोदींनी मोठ्या फरकानं विजय मिळवला. तेव्हा त्यांच्या विरोधात काँग्रेसचे इक्बाल दौद पटेल उभे होते. पटेल यांना ३३ हजार ७३३ मते मिळाली तर पूर्णेश यांना १ लाखांहून अधिक मते मिळाली होती.

२०१९ साली लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी काँग्रेस नेते राहुल गांधींनी कर्नाटक दौऱ्यावेळी एका सभेत मोदींच्या नावाचा उल्लेख करत ललित मोदी, नीरव मोदी यांची नावे घेतली होती आणि सर्व चोरांची आडनाव मोदी कशी काय असतात?, असा सवाल केला होता. याप्रकरणी पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. त्याच संदर्भात गुरुवारी, गुजरातमधील सुरत जिल्हा आणि सत्र न्यायालयानं राहुल गांधींना २ वर्षांनी शिक्षा सुनावली होती. मात्र, याप्रकरणात राहुल गांधींना तात्काळ जामीन मंजूर झाला होता. परंतु लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतूदीनुसार शुक्रवारी राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यात आली.

(हेही वाचा – Rahul Gandhi Disqualified: आम्ही कायदेशीर लढाई लढू – अभिषेक मनु सिंघवी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.