ट्रॅफिकचे नियम पाळण्यात उत्तराखंडाचे लोक पुढे!

147

ट्रॅफिक ही भारतातल्या अनेक शहरांमधली एक प्रमुख समस्या आहे. तरी ट्रॅफिक जाम होण्याचं प्रमुख कारण म्हणजे ट्रॅफिकचे नियम धाब्यावर बसवणे. आपल्या मुंबई आणि पुण्यात तर नियम मोडण्यालाच लोक प्राधान्य देतात. असं म्हणतात की ईशान्य राज्यातील लोक ट्रॅफिकचे नियम पाळतात.

मात्र आता उत्तराखंडातील एक व्हिडिओ समोर आला आहे आणि या व्हिडिओने सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे. @AshokKumar_IPS या ट्विटर हॅंडलवरुन फोटो व्हायरल करण्यात आले आहेत. ज्यामध्ये उत्तराखंडातील लोकांचं मनोधैर्य पाहायला मिळत आहे.

’यह तस्वीरें मिज़ोरम की नहीं बल्कि अपने #Uttarakhand के काशीपुर की हैं। जहां रेलवे क्रासिंग पर फाटक बंद होने पर लोग कुछ इस अंदाज में अपनी लेन में खड़े हैं। फाटक खुला और कुछ ही समय में ट्रैफिक सुचारू रूप से चलने लगा। न जाम दिखा और न बेबजह हॉर्न का शोर। ट्रैफिक सेंस का सुंदर उदाहरण।’ असं कॅप्शन या फोटोंना देण्यात आलं आहे.

हे फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा

https://mobile.twitter.com/AshokKumar_IPS/status/1637438678531477504

उत्तराखंडाच्या काशीपूर रेल्वे क्रॉसिंगच्या जवळील हे फोटो आहेत. हे फोटो पाहून आपल्यासमोर एक सुंदर चित्र उभं राहतं. मुंबई-पुण्यात जर लोकांनी ट्रॅफिकचे नियम पाळले तर एका मोठ्या समस्येचे निराकरण होईल. हे फोटो लोकांना इतके आवडले की, लोक हे फोटो शेअर करुन या लोकांकडून शिकवण घेण्याचे आवाहन करत आहेत.

(हेही वाचा – उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वकिलांना काळ्या कोटापासून सूट)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.