ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वेगळा पक्ष स्थापन करून पाच आमदार तरी निवडून आणावे, असे राऊत म्हणाले. याच पार्श्वभूमीवर बोलत असताना भाजप आमदार राम कदम यांनी संजय राऊतांवर खरमरीत टीका केली.
एका मराठी वृत्तवाहिनीसोबत बोलत असताना राम कदम म्हणाले की, ‘राऊतांच्या टीकेला नेमके काय उत्तर द्यावे हेच कळत नाही. सगळे मंत्री सोडून गेले, आमदार-खासदार सोडून गेले, मात्र अहंकार काही यांना सोडून जायला तयार नाही. बाळासाहेब ठाकरेंचे नाव सगळ्या जगासमोर कोणी बदनाम केले? तुम्हीच लोकांनी केले ना? आणि यांच्यावर टीका केली आणि यांच्या चुका दाखवल्या तर याचा यांना आनंद वाटतो. म्हणजे राजकारणात पद घसरावे पण किती घसरावे. निव्वळ आकलेचे तारे तोडण्याचा भाग आहे. अडीच वर्षात काहीच काम केले नाही. याचा आनंद उद्धव गटाला होत असेल तर मोठी शोकांतिका आहे.
तसेच विधिमंडळला चोरमंडळ पुन्हा राऊतांनी म्हटले आहे. याला उत्तर देताना राम कदम म्हणाले की, ‘जशी दृष्टी तशी सृष्टी. त्यामुळे चोरांना सगळे चोर दिसणार’
(हेही वाचा – संजय राऊतांवरचा हक्कभंग प्रस्ताव राज्यसभेकडे पाठवणार? हालचालींना वेग)
Join Our WhatsApp Community