डायनोसॉरच्या पंजाचे रहस्य उघड; जाणून घ्या मनोरंजक सत्य

164

डायनोसॉर नामशेष झाला असला तरी लोकांना या प्राण्याविषयी जाणून घेण्यास प्रचंड उत्साह वाटतो. डायनोसॉरवर अनेक चित्रपट आले. आबालवृद्धांनी या चित्रपटांना डोक्यावर घेतले. आजही डायनोसॉरच्या बाबतीत अनेक संशोधन होत आहे. नुकत्याच झालेल्या एक संशोधनात वैज्ञानिकांनी डायनोसॉरच्या पंजांचा अभ्यास केला आणि त्या अभ्यासातून नवीन निष्कर्ष समोर ठेवण्यात आले आहेत.

डायनोसॉरचा पंजा हा त्याच्या शरीराचा अत्यंत महत्वाचा भाग असल्याचे समोर आले आहे. अनेक कार्यांमध्ये डायनोसॉर पंजांचा वापर करायचा. ब्रिस्टल युनिव्हर्सिटी आणि बिजिंगमधील इंस्टिट्युट ऑफ् व्हर्टिबरेट पेलेओंटोलॉजी ऍंड पेलेओएंथ्रोपोलॉजीच्या संशोधन संघाने हा नवा शोध लावून जगाला आश्चर्याचा धक्का दिला आहे. या अध्ययनातून असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की, डायनोसॉर शिकारीसाठी पंजांचा वापर करायचेच त्याचबरोबर जमीन खोदण्यासाठी देखील वापर करायचे.

अल्वारेजसॉरस आणि थेरिजिनोसॉरस अशा दोन प्रकारच्या थेरोपॉड डायनोसॉरवर संशोधन करण्यात आले आणि यातून ही तथ्ये प्राप्त झाली आहेत. या संशोधनातून त्यांच्या पंजांचे हे रहस्य उघडले आहे. अल्वारेजसॉरस आपल्या पंजांनी सहज दगड उचलत असे, तसेच जमीन खोदण्यासाठी देखील वापर व्हायचा. तसेच थेरिजिनोसॉरसचे पंजे जास्त मोठे असल्याचे आढळून आले.

युनिव्हर्सटी ऑफ ब्रिस्टल आणि आयव्हीपीपीचे पीएचडी विद्यार्थी आणि अध्ययन प्रमुख जीचुआन क्विन यांनी नव्या अशा संगणकीकृत बायोमॅकेनिक पद्धतींचा वापर करुन डायनोसॉरच्या पंजांची तुलना अनेक सजीव प्राण्यांच्या पंजांशी केली आणि यातूनच डायनोसॉरच्या पंजांचे महत्व आणि त्यांचे काम समोर आले आहे. भविष्यात या संशोधनातून अनेक निष्कर्ष निघू शकतात आणि इतर संशोधकांसाठी हे अध्ययन अतिशय महत्वाचे ठरणार आहे.

(हेही वाचा – जगासमोर हात पसरणारा पाकिस्तान सुखी आणि जगाला मदत करणारा भारत दुःखी कसा?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.