युरोप, अमेरिकेत आढळलेले कोरोनाचे‎ व्हेरियंट आता महाराष्ट्रातील ‘या’ शहरात

120

मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या‎ रुग्णसंख्येत वाढ होत आहे. पहिल्या‎ दोन लाटेप्रमाणे सध्या असलेला कोरोना‎ व्हेरियंट घातक नाही मात्र मागील काही‎ दिवसांत शहरात आढळलेल्या कोराेना‎ रुग्णांमध्ये तीन नवे व्हेरियंट आढळले‎ आहेत. यापूर्वी हेच व्हेरियंट युरोप,‎ अमेरिकेत आढळले आहेत. नविन‎ व्हेरीएंटमुळे घाबरण्याचे कारण नाही‎, मात्र प्रत्येकाने सावधगिरी बाळगणे‎ आवश्यक असल्याचे कोविड-१९‎ विषाणू तपासणी प्रयोगशाळेचे नोडल‎ अधिकारी डॉ. प्रशांत ठाकरे यांनी सांगितले.‎ दरम्यान महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात युरोप, अमेरिकेत आढळलेले कोरोनाचे‎ व्हेरियंट आढळले आहेत.

अमरावती जिल्ह्यात सध्या वातावरण बदलामुळे‎ सर्दी, खोकला, ताप आजाराच्या‎ रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर‎ वाढली आहेत. यातच जिल्ह्यात‎ आतापर्यंत ‘एच३ एन२’ चे पाच रुग्ण‎ आढळून आले आहेत. त्यापैकी दोन‎ रुग्णांना सुटी देण्यात आली असून, तीन‎ रुग्णांवर इर्विन रुग्णालयात उपचार सुरू‎ आहेत. याचवेळी कोरोनाचे ३५ रुग्ण‎ सक्रिय आहेत, अशी माहिती जिल्हा‎ शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे‎ यांनी दिली आहे.

‎सध्या जिल्ह्यात ३५ कोरोना रुग्ण‎ सक्रिय असून त्यांची लक्षणे सौम्य‎ असल्याने त्यांना गृहविलगीकरणात‎ ठेवण्यात आले आहे. परंतु रुग्णांची‎ संख्या दिवसेंदिवस वाढत गेली तर‎ खबरदारी म्हणून जिल्हा आरोग्य‎ प्रशासनाने इर्विन रुग्णालयात‎ आयसोलेशन वाॅर्डची तयारी केली‎ आहे. सध्या याच वॉर्डमध्ये ‘एच३ एन२’‎चे रुग्ण उपचार घेत आहेत.

४७‎ नमुन्यांची केली एनआयव्हीमध्ये‎ तपासणी

१७ फेब्रुवारी २०२३ पासून शहर‎ व जिल्ह्यात कोविड पॉझिटिव्ह‎ आलेल्या रुग्णांपैकी ४७ नमुने‎ तपासणीसाठी ‘एनआयव्ही’ पुण्यात‎ पाठवले होते. त्यापैकी एका नमुन्यामध्ये‎ एक्सबिडी.१ व्हेरीएंट आढळला.‎

(हेही वाचा – रेशनकार्ड धारकांसाठी गुड न्यूज; ‘आनंदाचा शिधा’चे वितरण महिनाभर सुरू राहणार)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.