भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने रविवारी एकाचवेळी 36 उपग्रह लाँच केले. ब्रिटिश कंपनीच्या उपग्रहांना घेऊन एलव्हीएम-3 रॉकेटने सकाळी 9 वाजता श्रीहरिकोटा येथून अवकाशात उड्डाण घेतले. या रॉकेटने एकत्र 36 उपग्रह लाँच करण्यात आले.
( हेही वाचा : राजस्थानच्या बिकानेरमध्ये ४.२ तीव्रतेचा भूकंप )
इस्रोच्या साडे 43 मीटर लांबीच्या या रॉकेटने ब्रिटेनच्या कंपनीचे 36 उपग्रह घेऊन अवकाशात झेप घेतली. उपग्रहांना घेऊन एलव्हीएम-3 ने झेप घेतल्यानंतर या रॉकेटचे एकूण वजन 5 हजार 805 टन झाले. या मिशनला एलव्हीएम-3 /वनवेब इंडिया-2 असे नाव देण्यात आले आहे.
इस्रोने ट्वीट करुन या मिशनच्या लाँचिगची माहिती दिली आहे. एलव्हीएम-3 हे इस्रोचे सर्वात मोठे रॉकेट असून याने आतापर्यंत पाच वेळा यशस्वी उड्डाण केले आहे. यामध्ये चंद्रयान-2 मिशनचा सुद्धा सहभाग आहे. ब्रिटेनच्या वनवेब ग्रुप कंपनीने इस्रोच्या वाणिज्यिक शाखा न्यूस्पेस इंडिया लिमिटेडसोबत 72 उपग्रह लाँच करण्याचा करार केला आहे. याअंतर्गत 23 ऑक्टोबर 2022 रोजी 23 उपग्रह इस्रोने यापूर्वीच लाँच केले होते.
आता उर्वरित 23 उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत जाणार आहेत. इस्रोच्या या लाँचिगमुळे पृथ्वीच्या कक्षेत वेब वन कंपनीच्या उपग्रहांची एकूण संख्या 616 होणार आहे. इस्रोचा या वर्षीचा हा दुसरा लाँच आहे. ही लाँचिग यशस्वी झाल्यास वनवेब इंडिया-2 स्पेसमध्ये 600 पेक्षा जास्त लोअर अर्थ ऑर्बिट सेटेलाइट्सच्या कान्स्टलेशन पूर्ण करणार आहे.
Join Our WhatsApp Community