सभेपूर्वीच उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंचा दणका! ३ माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

107

उद्धव ठाकरे यांची रविवारी मालेगावमध्ये सभा होणार आहे. या सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या सभेपूर्वीच एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना मोठा झटका दिला आहे. कारण ठाकरे गटातील काही पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यामध्ये ३ माजी नगरसेवकांसह काही पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. विशेषत: संजय राऊत हे नाशिकमध्येच असतानाच या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

( हेही वाचा : इस्रोची ऐतिहासिक कामगिरी! LMV-3 सर्वात मोठ्या रॉकेटची अवकाशझेप, एकाचवेळी 36 उपग्रह लाँच )

नाशिकमधील पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

नाशिकच्या मालेगावमध्ये सायंकाळी उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. नाशिकहून ठाकरे गटाचे उपमहानगर प्रमुख शशिकांत कोठुळे यांच्यासह माजी नगरसेविका श्यामला हेमंत दीक्षित, माजी नगरसेवक उत्तम दोंदे, प्रभाकर पाळदे यांच्यासह शरद देवरे, शोभा गटकाळ, मंगला भास्कर, शोभा मगर, अनिता पाटील, ज्योती देवरे, आशा पाटील, सीमा पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ज्यावेळी संजय राऊत हे नाशिकमध्ये यायचे त्यावेळी वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांचा व माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश व्हायचा. त्यानंतर आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर येत असताना पुन्हा ठाकरे गटातील काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आता स्वतः उद्धव ठाकरे सभेसाठी नाशिकमध्ये येण्यापूर्वीच त्यांना एकनाथ शिंदेंनी धक्का दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.